लाखनी कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त

0
24

लाखनी,दि.13ः-कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ च्या कलम ४५(१) नुसार बरखास्त करण्यात आली आहे. कृउबास लाखनीमध्ये कार्यरत असलेल्या एकूण २३ संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळे व भ्रष्टाचाराच्या संबधाने लाखनी येथील सामाजिक व भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे कार्यकर्ते डॉ. दीपराज इलमकार यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालय भंडारा येथे तक्रार दाखल केली होती.
जिल्हा उपनिबंधकाच्या बरखास्तीच्या आदेशाच्या विरोधात अपील घेता येत नाही याकरिता अँड. हिमांशू अनिल खेडीकर, लाखनी यांच्या मार्फत नागपूर खंडपीठ, नागपूर येथे रिट पिटीशन क्रं ७00८/२0१८ दाखल केली. त्यावर सुनावनी होऊन न्यायमूर्ती मनिष पितळे यांनी दि. ९ जानेवारी २0१९ च्या आदेशात स्पष्ट केले की, पणन व सहकार मंत्री यांना जिल्हा उपनिबंधकाने बरखास्त केलेल्याच्या आदेशाच्या विरोधात अपील घेता येत नाही असा ऐतिहासिक निर्णय दि. ९ जानेवारी २0१९ दिला असल्यामुळे राजकीय पक्षाचे धाबे दनाणले आहेत.
आता कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनीमध्ये प्रशासक बसणार असल्याने राजकीय पुढार्‍यांनी पुढील निवडणुकीकरीता आपली रणनिती आखण्याची सुरुवात केल्याने उमेदवार बाशिंग बांधून तयार झालेले आहेत. याव्यतिरिक्त डॉ. दीपराज इलमकार यांनी पणन संचालक, पूणे, यांच्याकडे दिलेल्या तक्रारीच्या आधारे समितीने केलेल्या भ्रष्टाचार व गैर कारभारामुळे सन २0१0 ते २0१५ या काळातील फेर लेखापरिक्षण करण्याचे आदेश सह संचालक (पणन), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी जिल्हा विशेष लेखापरिक्षण, सहकारी संस्था, भंडारा यांना दि. २७ डिसेंबर २0१८ च्या पत्रांद्वारे आदेशीत केले आहे.