गोंदियात जयाकिशोरी यांचा कार्यक्रम १६ ते १८ फेब्रुवारीपर्यंत

0
10

गोंदिया,दि.15 : मनोहरभाई पटेल अँकॅडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या सानिध्यात गोंदियात जयाकिशोरी यांचा ‘नानी माँ का मायरा’ या कार्यक्रमाचे आयोजन १६ ते १८ फेब्रुवारीपयर्ंत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला घेऊन ११ जानेवारी रोजी मारवाडी युवक मंडळात सभा पार पडली. या सभेत शहरातील सर्व समाज संघटनांना बोलविण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी दामोदर अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, युवक मंडळाचे अध्यक्ष गोंविद अग्रवाल, हुकूमचंद अग्रवाल, पवन अग्रवाल, संकल समाज समितीचे अध्यक्ष त्रिवेणी अग्रवाल, प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थाचे विनोद हरीणखेडे, सिंधी जनरल पंचायतचे साजनदास वाधवानी, हरे माधव परमार्थ सत्संग समितीचे अध्यक्ष गोवर्धनदास चावला, सुनील पृथ्यानी, त्रिलोचन बग्गा, चेतन बजाज, सिताराम अग्रवाल, कलार समाजाचे मनिष चौरागडे, जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष सचिन मिर्शा, बजरंग दलचे सचिन चौरसिया, सख्खर पंचायतचे लक्ष्मीचंद रोचवानी, गुजराती स्कूलचे सचिव जयेशभाई पटेल, जायसवाल समाजाचे प्रतिनिधी अजय जायस्वाल, जैन समाजाचे अध्यक्ष संजय जैन, समग्र ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष निलेश चौबे, राजस्थानी ब्राम्हण समाजाचे महेश पुरोहित, कडवा पाटीदार समाजाचे अध्यक्ष मोहनभाई पटेल, शिवकुमार शर्मा, सुरज गुप्ता आदींसह मोठय़ा संख्येत विविध समाजातील समाजबांधव उपस्थित होते.