सार्वजनिक सेवेतील वाहनांना आता लोकेशन ट्रॅकींग डिव्हाईस, इमर्जन्सी बटन अनिवार्य

0
9

वाशिम, दि. १५ : केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १२५मध्ये  (एच) नव्याने दाखल केला आहे. या अधिसूचनेनुसार सर्व सार्वजनिक सेवा वाहनांची लोकेशन ट्रॅकींग डिव्हाईस व इमर्जन्सी बटन बसविणे १ जानेवारी २०१९ पासून अनिवार्य करण्यात आले आहे.

केंद्र शासनाने सदर अधिसुचनेनुसार सर्व सार्वजनिक सेवा वाहनांची लोकेशन ट्रॅकींग डिव्हाईस व इर्मजन्सी बटन बसविणे आवश्यक केले असून, त्यामधून दुचाकी वाहने, ई-रिक्षा, तीनचाकी वाहने व ज्या वाहनांना परवाना लागू नाही, अशी वाहने वगळण्यात आलेली आहे. विषयांकित सुधारणेनुसार बसविणाऱ्या उपकरणांचा तपशील सध्या आयएस:१४०:२०१६ या मानकानुसार व नंतर लागू होणाऱ्या बीएसआय मानकानुसार असून सदर उपकरण बसविणे उत्पादक, विक्रेता व संबंधित चालनकर्ता, ऑपरेटर यांना बंधनकारक आहे. अधिसूचनेची अंमलबजावणी १ जानेवारी २०१९ पासून करण्यात आली आहे.

जानेवारी २०१९ पासून दुचाकी वाहने, ई-रिक्षा, तीनचाकी वाहने व ज्या वाहनांना परवाना लागू नाही, अशा वाहनाव्यतिरिक्त नवीन नोंदणी होणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा (पब्लिक सर्व्हिस) वाहनांमध्ये विहीत मानकानुसार लोकेशन ट्रॅकींग डिव्हाईस व इमर्जन्सी बटन बसवल्याची खात्री करून मगच पुढील कामकाज करण्यात येईल, याबाबत सर्व वाहन उत्पादक, वाहन विक्रेते, स्टेक होल्डर व वाहनधाकर यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.