शिवसेना तालुकाप्रमुख राज बोम्बार्डे यांचे निधन

0
12

गोरेगाव,दि.15ः- शिवसेना माजी तालुकाप्रमुख राज बोम्बार्डे यांचे आज, मंगळवार १५ जानेवारी रोजी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात मधूमेह आजारावर उपचार घेत असताना सायंकाळच्या सुमारास निधन झाले. मृत्यू समयी ते ४५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, भाऊ बराच आप्त परिवार आहे. बोम्बार्डे यांनी शिवसेना गोरेगाव तालुका प्रमुखाची सुत्रे हाती घेतल्यानंतर तालुक्यात शिवसेनेला चांगले दिवस मिळवून दिले होते. मात्र, मधूमेह आजार जडल्यानंतर ते मागील काही महिण्यांपासून शिवसैनिकांच्या संपर्कात नव्हते. त्यांच्या अशा निघून गेल्याने सर्वत्र विशेषतः शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.