क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार तत्पर-विनोद अग्रवाल

0
6

गोंदिया,दि.16 : मागील २0 वर्षापासून गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाच्या नावावर फक्त स्वार्थाचे राजकारण केले जात आहे. मात्र, गोंदियाचा खरचं विकास झाला का? गोंदिया विधानसभा क्षेत्र हा काही राजकारण्याचा स्वार्थीपणाचा बळी पडला आहे. अनेक ठिकाणी अद्यापही सोयी, सुविधांचा अभाव आहे. नागरिकांना योजनांचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळेच हा क्षेत्र सर्वांगिण विकासापासून दूर राहिला आहे. मात्र स्थानिक जनप्रतिनिधी विकासाचा गाजावाजा करून नागरिकांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे अशा संधीसाधू राजकारण्यापासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे, असे मत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.
ते अंभोरा येथे २५/१५ योजने अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी उपसरपंच राजेश रामटेके, दशरथ चौधरी, सोमा तुरकर, भरतलाल साठवणे, शिवचरण साठवणे, नोकलाल चौधरी, गोखलाल चौधरी, सोमा पटले, डिलेचंद चौधरी, आशाचंदा भिमटे, सुरेष भिमटे, किरण मेर्शाम, दशरथ तुरकर, रामलाल तुरकर, जीवनलाल येडे, चंदन पारधी, ब्रिजलाल चौधरी, चैतराम पटले, मंगरू चामलाटे, भिवराम सोनटक्के, मुकेश डहाट, संजय मेर्शाम, धमेंद्र रामटेके, पुस्तकला तुरकर, मंतरूबाई पटले, वामनबाई चौधरी, योगिताबाई पटले, योगेंद्र हरीणखेडे, जयलाल चौधरी, देविलाल पारधी आदिं सह गावकरी मोठया संख्येत उपस्थित होते.