मतदारांनो डायल करा @ 1950 टोल फ्री क्रमांक : जिल्हाधिकारी यांचे आवाहन

0
6
लोकसभा निवडणूककरिता मतदारांसाठी शंका निरसन संपर्क केंद्र कार्यान्वित
गोंदिया,दि.16- निवडणूक प्रकियेत मतदार हा लोकशाहीची आत्मा असून विविध प्रकारच्या सोई-सुविधा मतदारांना उपलब्ध करण्यात येत आहेत. याच पार्श्वभुमिवर निवडणूक प्रक्रिया सुलभरीत्या पार पाडण्यासाठी तसेच नव-मतदारांच्या विविध समस्या व शंका निरसन करण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ. कादरंबरी बलकवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत जिल्हा संपर्क केद्र उभारुन टोल फ्री क्रमांक @ 1950 कार्यान्वित केले आहे. सदर उपक्रमातून विविध मतदारांना त्यांच्या शंकांचे निरसन करण्यास मदत होईल.
          आगामी निवडणूक प्रक्रियेत जास्तीत-जास्त मदारांचा सहभाग नोंदवून मतदानाच्या  टक्केवारीत वाढ करण्याचे प्रयत्न निवडणूक विभागाकडूण करण्यात येत आहे. जिल्हायातील नागरीकांना व मतदारांना मतदार यादीबाबत असलेल्या प्रश्नांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी, मतदार यादीतील नाव व अनुक्रमांक, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे किंवा दुरुस्त करणे, दिव्यांग मतदारांसाठी सोई-सुविधा व त्यांच्या समस्या या सह निवडणूक प्रकियेबाबत माहिती देण्याच्या अनुषंगाने नागरीकांना व मतदारांना जिल्हा संपर्क केंद्रतील @1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत मतदारांना या ठिकाणी संपर्क साधता येईल.
             जिल्हा संपर्क केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत कार्यान्वित करण्यात आले असून बी.एस.एन.एल लॅंडलाईन दूरध्वनी व मोबाईल मधून या  टोल फ्री क्रमांकावर संपर्क करता येईल. या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करुन सर्व नागरीक व मतदारांनी आपल्या शंकांचे निरसन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.