आदिवासी मन्नेवार समाजाची मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

0
16

अहेरी,दि.17ः-1950 वर्षापूर्वीचे अनेक महत्वपूर्ण सबळ पुरावे मन्नेवार समाजाकडे असतांनाही मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र न देता समाजाचे सर्व प्रकरण गडचिरोली येथील जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती अवैध ठरवित असल्याने याचे निषेध करण्यासाठी व जात वैधता प्रमाणपत्र समितीवर योग्य करवाई करुन आदिवासी मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याची मागणी करित काल अहेरी येथील शंकरराव बेझलवार महाविद्यालय पासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे रूपांतर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जाहिरसभेत करण्यात आला. या जाहिरसभेत आदिवासी मन्नेवार समाजाचे अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केले. समाजावर सातत्याने सरकार व जात वैधता समितिकडून होणाऱ्या अन्यायाच्या व सरकारच्या दुहेरी नीतीबद्दल हजारो मोर्चेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत राज्य सरकार व जात वैधता पडताळणी समिती गडचिरोलीचे अधिकारी व समितीचे सदस्यविरुद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली. यावेळी आदिवासी मन्नेवार समाजाने अप्पर जिल्हाधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात आदिवासी मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यात यावी,राज्य सरकार स्वतंत्र आयोग गठित करून समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षिणक व इतर समस्यांची संशोधन करण्यात यावी.1950 वर्षापूर्वीचे पुरावे असतानाही समाजाला जात वैधता प्रमाणपत्रा पासून वंचित ठेवणारे गडचिरोली येथील जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीवर योग्य कारवाई करण्यात यावी, मन्नेवार व मन्नेपवार हे एकच समाज असून ‘प’ या शब्दाची घोळ दूर करण्यात यावी आदी मागण्यांच्या समावेश होता.या मोर्चात आल्लापल्ली , अहेरी, कंनेपल्ली, सिरोंचा,आसरअली,अंकीसा,बोगापूर,मृदुकृष्ण्पूर,नगरम, रंगधामपेठा,सिरोंचामाल, बेज्जूरपल्ली,छेल्लेवाडा, कमलापूर आदि गावातील हजारो मन्नेवार समाजाचे नागरिक उपस्थित होते.