जनतेंनी ‘स्वच्छते’च्या महाजागरात भाग घ्यावा-हभप मंगेश महाराज

0
10

चंद्रपूर,दि.23ः- भारतीय संस्कृती ही आध्यात्मावर आधारित नसून आध्यात्म व संत साहित्यांतून नवीन उपक्रम स्वच्छतेच महाजागर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यात प्रवचनकार व अधिकारी लोकसहभागातून यशस्वी व्हावे यासाठी जनतेंनी ‘स्वच्छते’च्या महाजागरात भाग घ्यावे,असे आवाहन हभप मंगेश महाराज यांनी केले.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त उपक्रमातून दि.२६ जानेवारी ते १0 फरवरीपयर्ंत जिल्ह्यात स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रमाच्या माध्यमातून हभप मंगेश महाराज यांनी हाती घेतला आहे. याप्रसंगी ते बोलत होते.साहित्यांच्या माध्यमातून सरकारी यंत्रणेसोबत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. धार्मिक कार्यातून स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्याचे काम या माध्यमातून होणार आहे. महाराष्ट्र सरकार व वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जनतेवर स्वच्छतेचा जागर होणार आहे.
हा जागर म्हणजेच ईश्‍वर सेवाच आहे.अध्यात्म्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यापासून तर सर्व जनतेवर प्रकाश टाकण्याचे काम मंगेश महाराजांनी हाती घेतले आहे.
तत्पुर्वि प्रत्येक गावात या उपक्रमाचे वातावरण निर्मिती व्हावी, नागरिकांचा सहभाग मिळावा, याकरिता स्थानिक स्तरावर प्रयत्न करण्याचे आवहन हभप मंगेश महाराज यांनी केले. वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता,घनकचरा, सांड पाणी,ओला कचरा व सुका कचरा, स्वच्छालयाचा नियमित वापर,प्लास्टिक बंदी, घरासमोर,सार्वजनिक सभागृहे व शाळेच्या आवारातील स्वछतेबाबत ग्रामस्त व जनता यांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून सांगावे लागेल.
याकरिता या स्वच्छतेचा महाजागर या उपक्रमाला यशस्वीतेकरिता जनतेने मोठय़ा संख्येने प्रतिसाद देऊन आपला गाव तसेच चंद्रपूर जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महाराजांच्या वतीने करण्यात आले आहे.