आविमच्या केंद्रावरील धानाच्या मोबदल्यासाठी अधिकार्यांना घेराव

0
10

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.22ः- कुरखेडा तालुक्यातील आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या धान खरीदीच्या चुकार्यास उशीर होत असल्याने तसेच खरेदी केन्द्रावरील धानाची उचल मुदतीत होत नसल्याने काही केंद्रावर खरेदी प्रक्रीया ठप्प पडल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याने याचा जाब विचारण्याकरीता आज मंगळवारला तालुका कांग्रेस पक्षाचा वतीने महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक निलेश सोरपडे व निरीक्षक के आर पंधरे याना कुरखेडा येथील धान खरीदी केन्द्रावर घेराव घालण्यात आला. तसेच लवकरात लवकर समस्या मार्गी न लागल्यास महामंडळ व शासनाचा कार्यप्रणाली विरोधात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कुरखेडा तालुक्यात आविम उपप्रादेशिक कार्यलय कूरखेडा अंतर्गत कूरखेडा,वडेगाव,आंधळी,गेवर्धा,देऊळगाव,पलसगड,गोठणगाव,सोनसरी,घाटी,कढोली या संस्थामार्फत आधारभूत धान खरेदी योजना राबविण्यात आली. यावर्षी खुल्या बाजार पेठेत धानाला अपेक्षीत भाव नसल्याने मोठ्या प्रमाणात धानाची विक्री आधारभूत धान खरेदी केन्द्रावरच करण्यात आली. खरेदी केन्द्र सुरु होण्यापुर्वी शेतकर्याना आविमचे प्रादेशिक व्यवस्थापक गांगुर्डे यानी आनलाइन पेमेंट पध्दतीमूळे धान विक्रीचे चुकारे संबंधित शेतकर्यांचा बॅंक खात्यात तिन दिवसात अदा करण्यात येतील असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्येक्षात महामंडळाचा नियोजन शुन्य कार्यप्रणाली व राज्य शासनाचा शेतकरी विरोधी भुमिकेमुळे दिड ते दोन महिण्याचा कालावधी होऊनही अनेक केन्द्रातील चुकारे थकलेले आहे आर्थीक अडचणीत सापडलेला शेतकर्याना रबी हंगामाचे नियोजन कसे करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच येथील अनेक केन्द्रातील धान साठवणूक क्षमता संपल्याने खरेदी प्रक्रिया बंद पडलेली आहे. तात़डीने धानाची उचल करण्यात यावी प्रमाणापेक्षा अधिक काटा घेत शेतकर्यांची लुबाडणूक करणार्या संचालकांची चौकशी करीत कार्यवाही करण्यात यावी मागण्यावर कार्यवाही न झाल्यास महामंडळ व राज्य शासनाचा शेतकरी विरोधी धोरणाचा विरोधात रस्त्यावर उतरत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा कांग्रेस तालुका अध्यक्ष जयंत हरडे,माजी जि प उपाध्यक्ष जिवन पाटील,जि प सदस्य प्रल्हाद कराडे, प्रभाकर तुलावी, प स सभापती गिरधर तितराम, उपसभापती मनोज दुनेदार, आनंदराव जांभुळकर, नगरसेवक ऊसमान खान, कपील पेदांम, विजय भैसारे, रवि मेश्राम, रोहीत ढवळे, हीरामन सोनकूसरे ,मनोहर मेश्राम, मनोहर राऊत व शेतकर्यानी दिला आहे.