मोगर्रा येथे अनेंकाचा भाजपात प्रवेश

0
13

गोंदिया,दि.23ःमागील ४ वर्षांपासून राज्य व केंद्रात जनविकासाची विविध कामे केली जात आहे. अनेक महत्वपूर्ण व धाडसी निर्णय घेवून सर्वसामान्यांना त्याचा थेट लाभ मिळेल, अशा योजना अंमलात आणण्यात आल्या. सर्वसामान्यांना अनेक योजनांचा लाभ देवून त्यांचा विकास केला जात आहे. कॉंग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली होती. मात्र ही यात्रा कॉंग्रेसने पार्टीचा अस्तित्व वाचविण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आले असल्याचे भाजचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले. सर्वसामान्यांना विकासासाठी राबविण्यात येणार्‍या योजना व कामांना प्रभावित होवून गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्राम मोगर्रा येथील शेकडो ग्रामस्थांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत भाजपात प्रवेश केला.
ग्राम मोगर्रा येथे कार्यकर्ता प्रवेश कार्यक्रमानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, भाऊराव उके, लखन हरीणखेडे, दिलीप मुंडेले, अनुराग शुक्ला, पटले यांच्या गावकरी उपास्थित होते. भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांमध्ये मोगर्रा येथील सुखराम सावसाखडे, भाऊराव सावसाखडे, लखाराम रंधाये, हरीचंद रंधाये, हरीलाल घोरमारे, नरबत धारने, गुलाब चौधरी, घनश्याम रंधाये, राधेश्याम रंधाये, तुकाराम घोरमोडे, दशरथ रंधाये, ताराचंद रंधाये, शंकर रंधाये, सकाराम रंधाये, दिनेश रंधाये, मेहतर भल्ले यांच्यासह अनेक नागरिकांचा समावेश आहे. क्षेत्राच्या विकासासाठी आपला विनोद अग्रवाल यांना पाठिंबा असल्याचे मत प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले