युवा भोयर पवार मंचच्या महिला स्नेह्मीलनाला प्रतिसाद

0
19

नागपूर,दि.28ः-युवा भोयर पवार मंचच्यावतीने रविवार(दि.27)ला त्रिमूर्तीनगरातील celibration hall  येथे  महिला मेळावा व हळदीकूंकु कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.कुमुद राऊत होत्या तर उदघाटन डॉ.जयश्री बारंगे (चौधरी) यांच्या हस्ते झाले.प्रमुख पाहुणे म्हणुन सरिता कौशिक, उषा पटले मंचावर उपस्थीत होत्या.
या कार्यक्रमात मकरसंक्रातीवर डॉ. जयश्री बारंगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.तर पत्रकारिता या विषयवार सरिता कौशीक यांनी मार्गदर्शन करतांना महिलांचे पत्रकारीतेतील योगदान याबद्दल माहिती दिली.या कार्यक्रमात फुल्वन्ताआई चौधरी,पुष्पा विष्णू ढोले नागपूर,रुक्माबाई सितारामजी चोपडे कोंढाळी या महिला शक्तींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच निलेश हरिरामजी फरकाडे यांचा सत्कार समाजाचे वरिष्ठ व मार्गदर्शक नामदेवराव राऊत यांचे हस्ते करण्यात आले.या स्नेहमिलन व महिला मेळाव्याप्रसंगी वेशभूषा व उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या. संचालन अंजूताई देवासे यांनी केले तर आभार शालिनीताई देशमुख यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनंदा गाखरे,सीमा चौहान,भारती देशमुख,मंदा फरकाडे,सुवर्णा बण्णग्रे,मीनाक्षी टेंभरे,निशा रबड़े,साधना फरकाडे,संगीता गाखरे,मृणाल घाघरे,सविता बारंगे,सपना चोपडे,मनिषा चौधरी,अनिता चौधरी,वैशाली डोंगरे,वंदना धारपूरे,आदी महिलांनी सहकार्य केले.तसेच  श्रीरामजी धारपूरे,श्रावण फरकाडे,सुरेश देशमुख, मुकुंद बन्नग्रे, जीवन देशमुख, लालचंद चौधरी, मनोज चव्हाण, लक्ष्मण देवासे, प्रशांत पठाडे,प्रफुल्ल घाघरे,जग्ग्नाथजी गाखरे,राजू चोपडे.आदींचे सहकार्य लाभले.