कुंभारेनगर महोत्सव महिलांच्या कलागुणांचे दर्शन घडविणारा-वर्षा पटेल

0
16
अप्रतिम सादरीकरणाने कुंभारेनगर महोत्सवाचे उद््घाटन
गोंदिया,,दि.११ : पहिल्यांदाच एका वार्डाच्या महिला,पुरूष,युवक व युवती ऐकत्रित होवून कुंभारेनगर महोत्सव आयोजित करून गोंदियाकरांना नवा संदेश दिला आहे. ज्या महिला आधी चूल आणि मूल यापुरत्याच मर्यादित राहत होत्या.आता कुंभारेनगर महोत्सवाच्या माध्यमातून या वार्डातील महिलांच्या सुप्त कलागुणांचे दर्शन पाहायला मिळाल्याचे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षाताई पटेल यांनी केले. त्या प्रज्ञाशिल बहुुउद्देशिय सामाजिक संस्था व नवोदित नवचैतन्य साहित्य कलामंचाच्यावतीने आयोजित कुंभारेनगर महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत्या होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक पंकज यादव,बसपाचे जिल्हाध्यक्ष धु्रवास भोयर, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर,नगरसेवक संकल्प खोब्रागडे,साहित्यीक यशवंत तागडे व अन्य उपस्थित होते. पूढे बोलताना वर्षाताई पटेल म्हणाल्या,कुंभारेनगर महोत्सव हा नवनिर्मिती व परंपरेचा सुंदर संगम व नवा आविष्कार आहे. हा केवळ श्रवणानंद देणारा सोहळा नव्हे तर आत्मिक आनंद देणारी मेजवानी होय. ही कुंभारेनगर महोत्सवाची परंपरा नेहमीच सुरू राहीली पाहिजे. आमच्या जे ह्या महोत्सवासाठी करता येईल. ते करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. कारण ह्या महोत्सवातून महिलांच्या अंगातील सुप्त गुण समोर आले. ते मला पाहायला मिळाले. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिला. तेव्हा आमच्या या महामानवांच्या विचारांना घेवून समोर जायचे असून महिलांनी समोर येवून नवक्रांती करून देशातील समाजविघातक प्रवृत्तीच्या पक्षांना बाहेर फेकायचे आहे. असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन युवा साहित्यिक व पत्रकार उदय चक्रधर यांनी केले. तर आभार तुषार मेश्राम यांनी मानले. कुंभारेनगर महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला. वृक्षारोपणन कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक संकल्प खोब्रागडे यांनी केले.  तर प्रमुख पाहुणे म्हणून तिर्थराज नागदेवे,यशवंत तागडे,पतीराम मेश्राम,श्रीराम कुथेकर, कृष्णाजी सांगोडे,अशोक मेश्राम,विजय मेश्राम, मनोहर दरवडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  विनय सांगोडे,प्रणय दरवडे,अनिवेश तागडे, उत्तमा गोंडाणे,निर्मला मेश्राम, वैशाली चंद्रिकापूरे,सुप्रिया नागदेवे,सयोगीता मेश्राम,सपना मेश्राम,रंजिता इंदूरकर,शोभा वैद्य,लता पाटील, रितू राहुलकर,चंद्रलेखा गजभिये, आकाश बन्सोड,नवनीत भाष्कर, विशेष डोंगरे, प्रेमरतन गडपायले,दुर्गेश येल्ले, प्रमोद भोयर यांनी परिश्रम घेतले.