शौचालय निर्मितीसह स्वच्छतेवर भर द्या : दयानिधी

0
17
गोंदिया,दि.11 : कचारगड येथे १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार्या यात्रेसाठी ७ फेब्रुवारी रोजी मुकाअ डॉ. राजा दयानिधी यांनी प्रशाकीय यंत्रणेसह कचारगड येथे भेट देऊन पाहणी केली व भाविकांच्या सोयीसाठी शौचालय निर्मितीसह स्वच्छता व स्वच्छ पाणी पुरवठ्याचे निर्देश दिले तथा सोयी सुविधांचा आढावा घेतला..
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. ई. ए. हासमी, जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. वैरागकर, गटविकास अधिकारी एस.एन. वाघाये, सरपंच कैलाश धामडे, उपअभियंता खोंड, पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता आशिष अडमे, आरोग्य विस्तार अधिकारी एस.सी. झाडे, स्वच्छ भारत मिशनचे कार्यक्रम व्यवस्थापक सूर्यकांत रहमतकर, माहिती, शिक्षण संवाद तज्ञ अतुल गजभिये, ग्रामसेवक पी.एम. चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. धनेगाव येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २४ शौचालय व १२ न्हाणीघर (बाथरूम) ची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याबाबतचा आराखडा व प्रत्यक्षात जागेची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केली. दरम्यान धनेगाव येथे कचारगड समितीतर्फे तयार करण्यात येणा?्या चार शौचालयाच्या निर्मिती स्थळालासुद्धा त्यांनी भेट दिली व त्या ठिकाणात आवश्यक त्या सुधारणेचे निर्देश दिले. याप्रसंगी कनिष्ठ अभियंता अडमे यांनी कचारगड तीर्थस्थळी करण्यात येणा?्या पाणी पुरवठ्याबाबत माहिती दिली. दरम्यान घोडा मंदिर येथे मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी विशेष प्रावधान करून पाणी पुरवठ्यासाठी वेगळी लाइन देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. भेटी दरम्यान त्यांनी घोडा मंदिर परिसराला भेट दिली. भाविकांच्या सोयीसाठी या ठिकाणीसुद्धा १० शौचालय निर्माण करण्याचे दलदलकुही व मुरकुटडोह रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कचारगड देवस्थान समितीचे सचिव संतोष पंधरे, कोषाध्यक्ष बारेलाल वरखडे यांच्याशी संवाद साधून वीज पुरवठा, मुख्य कार्यक्रम स्थळ व इतर सोयींची माहिती घेतली. वैद्यकीय सुविधा आणि कचारगड येथे यात्रेदरम्यान होणा?्या भव्य आरोग्य शिबिर स्थळाची देखील त्यांनी पाहिणी केली.