राजाभोज जयंतीनिमित्त शहरात निघाली भव्य रॅली

0
36
गोंदिया,दि.११: चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांच्या जयंतीनिमित्त आज (ता.११) दुपारी १२ वाजता स्थानिक हिंदी टाऊन शाळेतून भव्य रॅली काढण्यात आली.  रॅलीने गोंदिया शहर दणादणले होते.
वसंत पंचमी प्रसंगी राजाभोज यांची जयंती साजरी करण्यात येते. सद्या जिल्ह्यातील अनेक भागात राजाभोज जयंती पर्व सुरू आहे. त्याचअनुषंगाने गोंदिया शहरात पवार प्रगतीशील मंच, प्रगतीशील शिक्षण संस्था, महिला  व युवा समिती क्षत्रिय पोवार संघटन नंगपुरा मुर्री, फुलचूर तसेच क्षत्रिय राजाभोज पवार समाज छोटा गोंदिया व पोवार समाज गोंदिया जिल्हा यांच्या संयुक्तवतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व संघटनांच्यावतीने हिंदी टाऊन शाळेतून रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा, गोरेलाल चौक, नेहरू चौक मार्गाने भ्रमण करत हिंदी टाऊन शाळेत परत येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला.या रॅलीत हजारोच्या संख्येने समाजबंधु सहभागी झाले होते.पहिल्यांदाच मोठ्याप्रमाणात निघालेल्या रॅलीने शहरातील वाहतुक व्यवस्था पुर्णत विस्कळीत केली होती.दोन ते तीन किलोमीटर लांब अशी ही रॅली जयस्तंभ चौक,गांधी प्रतिमा,गोरेलाल चौक,नेहरु चौक,आंबेडकर चौक मार्ग हिंदी टाऊन शाळेत पोचली तर दुसरी रॅली ही नेहरु चौक,सिव्हील लाईन मामा चौक मार्ग छोटा गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमस्थळी पोचली.हिंदि टाऊन येथे समारोपीय कार्यक्रमात माजी खासदार खुशाल बोपचे यांनी समाजबांधवाना मार्गदर्शन केले.
विशेष म्हणजे, पहिल्यांदाच राजाभोज जयंतीनिमित्त शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीने समाजातील एकतेचा संदेशही दिला. रॅली जयस्तंभ चौकात येताच रॅलीचे स्वागत  शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे,उपाध्यक्ष तेजराम मोरघडे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाèयांनी रॅलीचे स्वागत केले.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार राजेंद्र जैन यांनीही स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.रॅलीत प्रामुख्याने पवार प्रगतीशील मंचचे अध्यक्ष डॉ. कैलाशचंद्र हरिणखेडे,राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे संघटन सचिव खेमेंद्र कटरे,पवार प्रगतीशील मंचचे सचिव प्रा.डॉ. संजीव रहांगडाले,माजी जि.प.सदस्य संजय टेंभरे, राजेश राणे,कृमराज चव्हाण,सुरेश पटले,सुरेश भक्तवर्ती,छोटू बिसेन, दुर्गेश रहांगडाले, सुभानराव रहांगडाले, पप्पू पटले, कुलदीप रिनाईत, सुरेश पटले शिशिर कटरे, सविता तुरकर, अंजली ठाकुर,धनिषा कटरे,शितल रहागंडाले गोविंद येळे, महेन्द्र बिसेन,बाबा बिसेन, पंकज पटले, बबलू पटले, योगी येळे,गुलाब ठाकूर,केतन तुरकर,किशोर भगत,संदिप रहागंडाले,राहुल बिसेन,युवा स्वाभीमानचे जितेश राणे,धनंजय़ चव्हाण आदी हजारो समाजबांधव उपस्थित होते.