राज्य शिक्षण सल्लागार परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांचा दौरा 

0
40

वाशिम, दि.12 :  राज्य शिक्षण सल्लागार परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत देशपांडे हे १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिक्षणाधिकारी, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, वेतन पथक अधीक्षक, समाज कल्याण विभाग व विविध विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून चर्चा करतील. सकाळी १०.३० वाजता चिवरा येथील रामगोपाल विद्यालयास भेट, सकाळी ११ वाजता शंकरराव गवळी विद्यालय, अमानी, सकाळी ११.३० वाजता जिजामाता विद्यालय, पांगरी नवघरे, दुपारी १२ वाजता राष्ट्रीय विद्यालय, मसला, दुपारी १२.३० वाजता पांडुरंग विद्यालय, पिंपळा, दुपारी १ वाजता शिवाजी हायस्कूल, किन्हीराजा, दुपारी १.३० वाजता वसंतराव नाईक आश्रमशाळा, किन्हीराजा, दुपारी २ वाजता शासकीय आश्रमशाळा, मुसळवाडी, दुपारी २.३० वाजता शिवाजी हायस्कूल, जऊळका रेल्वे, दुपारी ३ वाजता डॉ. विठ्ठलराव जोगदंड विद्यालय, डव्हा, दुपारी ३.३० वाजता स्वामी समर्थ विद्यालय, मालेगाव, सायंकाळी ४ वाजता ना. ना. मुंदडा विद्यालय, मालेगाव, सायंकाळी ४.३० वाजता सनराईज इंग्लिश स्कूल, मालेगावला भेट व वाशिमकडे प्रयाण व मुक्काम.

१४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ना. ना. मुंदडा विद्यालय, मालेगाव, सकाळी १०.३० वाजता लक्ष्मीबाई घुगे विद्यालय, पांगरा बंदी, सकाळी ११ वाजता मातोश्री सुमनबाई हायस्कूल, मारसूळ, सकाळी ११.३० वाजता रणजितसिंह मोहिते-पाटील विद्यालय, ब्राह्मणवाडा, दुपारी १२ वाजता जय बजरंग विद्यालय, सुकांडा, दुपारी १२.३० वाजता राजूरकर विद्यालय, राजुरा, दुपारी १ वाजता नागनाथ विद्यालय, मेडशी, दुपारी १.३० वाजता विश्वभारती आश्रमशाळा, मेडशी, दुपारी २ वाजता माध्यमिक आश्रमशाळा, काळा कामठा, दुपारी २.३० वाजता मोरेश्वर विद्यालय, मुंगळा, दुपारी ३ वाजता शांती किसन विद्यालय, कळंबेश्वर, दुपारी ३.३० वाजता कुंडलकेश्वर विद्यालय, एकांबा, सायंकाळी ४ वाजता समई हायस्कूल, वडप, सायंकाळी ४.३० वाजता नर्मदाबाई अग्रवाल विद्यालय, डोंगरकिन्ही भेट व वाशिमकडे प्रयाण व मुक्काम.

१५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता राजीव गांधी विद्यालय, शेलगाव बोंदाडे, सकाळी ११ वाजता संत गजानन महाराज विद्यालय, करंजी, सकाळी ११.३० वाजता कोंडबातात्या ढवळे विद्यालय, शिरपूर, दुपारी १२ वाजता पीर महंमद उर्दू हायस्कूल, शिरपूर, दुपारी १२.३० वाजता अरिहंत विद्यामंदिर, शिरपूर, दुपारी १ वाजता मातोश्री कासाबाई दाभाडे विद्यालय, शिरपूर, दुपारी १.३० वाजता समाज प्रबोधन विद्यालय, खंडाळा शिंदे, दुपारी २ वाजता श्री शिवाजी हायस्कूल, येवता, दुपारी २.३० वाजता राष्ट्रीय विद्यालय, वसारी, दुपारी ३ वाजता विठ्ठल महाराज विद्यालय, तिवळी, दुपारी ३.३० वाजता कोंडबातात्या ढवळे विद्यालय, शिरपूर, सायंकाळी ४ वाजता वासुदेव बळवंत फडके उर्दू हायस्कूल, मालेगाव भेट व अमरावतीकडे प्रयाण करतील.