अदानीत रस्ता सुरक्षा सप्ताह

0
23

तिरोडा,दि.13: दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अदानी पावर महा. ली. तिरोडाच्या सुरक्षा विभाग व पोलीस प्रशासन आणि अदाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने ४ ते ९ फेबु्वारी या काळात रस्ता सुरक्षा सप्ताह रााबविण्यात आला. नागरिकांना रस्ता सुरक्षा संदर्भात जाणीव जागृती व्हावी याकतिा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये तिरोडा शहरातून व मजीतपूर, गंगाझरी येथून रस्ता सुरक्षा जाणीव जागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकुण जवळपास १६०० विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच तिरोडा तालुक्यातील विद्याथ्र्याकरिता रस्ता सुरक्षा या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील ९ शाळांच्या २०४ विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला.
त्याचप्रमाणे अदाणी पावर महाराष्ट्र लि. तिरोडाच्या कामगारांकरिता सुद्धा स्लोगन स्कीट, ऑन स्पॉट क्वीझ या सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभियानाचा शेवट ९ रोजी अदानी पावणचे प्रमुख सी.पी. साहू यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने अदानी पावरचे ऑपरेशन अ‍ॅन्ड मेन्टनन्स हेड अरीन्दम चटर्जी, चंद्रेश शुक्ला, नितीन पाठक, के.व्ही. qसग, पी. सूर्यकीरण, नितीन शिराळकर, बोधनकर, गांधेवार, कुळकर्णी सर्व विभाग प्रमुख व अदानी पावरचे कर्मचारी उपस्थित होते.