डॉ. वैशाली चौरे ठरली ‘मिस कुंभारेनगर’

0
28

गोंदिया  दि. १४ : : प्रज्ञाशिल बहुउद्देशीय सामाजिक संस्था व नवोदित नवचैतन्य साहित्य कलामंचाच्यावतीने आयोजित कुंभारेनगर महोत्सवात ‘मिस कुंभारेनगर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कुंभारेनगर येथील डॉ.वैशाली चौरे हिने आपल्या बुद्धीमत्तेचा परिचय देत परिक्षकांचे मने जिंकून ‘मिस कुंभारेनगर’ ठरली.
गोंदियात पहिल्यांदा एका वार्डाच्या नागरिकांनी ऐकत्र येत कुंभारेनगर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत ‘मिस कुंभारेनगर’ फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शो मध्ये डॉ.वैशाली चौरे, पायल मेश्राम, वैशाली रंगारी, वलिंदरा देशभ्रतार, प्रतिक्षा रायकर, अश्विनी चौरे, वैशाली रंगारी, पुष्पा मानकर, सोनल वैद्य, साक्षी कांबळे, प्रिया वंजारी, निखिता डोंगरे, श्रद्धा मेश्राम, चांदनी मेश्राम, ज्युनिली दरवडे या १५ स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. सौम्य म्युझिक , रंगीबेरंगी रोषणाई व नटून-सजून आलेल्या युवतींनी सर्वांचे मने रिझविली. कुंभारेनगर ह्या सात हजार लोकसंख्या असलेल्या वार्डात युवती व महिलांनी रॅम्पवर उतरून आपल्या अंगातील गुप्त कलागुणांचा आविष्कार घडवून आणला. आणि सभागृहात उपस्थित सर्वच प्रेक्षक अवाक झाले. मिस कुंभारेनगर फॅशन शो मध्ये सहभागी १५ युवतींपैकी डॉ. वैशाली चौरे हिने आपल्या चाणाक्ष बुद्धीचा परिचय परिक्षकांना देत ‘मिस कुंभारेनगर’ ठरली. या फॅशन शो ला परिक्षक म्हणून आज फोरमच्या मंजू कटरे व सामाजिक कार्यकर्त्या प्रा.सविता बेदरकर ह्या होत्या. फॅशन शो अगोदर कुंभारेनगरातील महिला एकल व सामुहिक नृत्य सादर करून अनेकांची मने रिजविली.
कार्यक्रमाचे संचालन बोधिनी डहाट व उके हिने केले. तर आभार उदय चक्रधर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्मिता गणविर, वैशाली चंद्रिकापूरे, स्मिता मेश्राम, उत्तमा गोंडाणे, विमल मेश्राम, प्रा. निलिमा मेश्राम, निकिता सांगोडे, शोभा वैद्य, सुनिता घरडे, पुष्पा मानकर इतरांनी परिश्रम घेतले.