वीज कोसळून बैल ठार

0
17

भंडारा ,दि.15: शुक्रवारीही वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात सर्वत्र गारांसह पावसाने हजेरी लावली. बोरीच्या व चना एवढ्या आकाराच्या गारा बरसल्या. या गारपिटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चौरास भागात गारपिटीचे प्रमाण जास्त आहे.साकोली तालुक्यातही विजांच्या गडगटासह पाऊस बरसला. यात पळसगाव सोनका येथील शेतशिवारात बांधलेल्या बैल जोडीतील एका बैलावर वीज कोसळली. यात बैलाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे पशुमालक तुकाराम नारायण कावळे यांचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. कावळे यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.