मार्चमध्ये कायदेविषयक जनजागृती व लोकअदालतींचे आयोजन

0
12

गोंदिया,दि.16 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया मार्फत तसेच तालुका विधी सेवा समिती आमगाव, देवरी, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव व तिरोडा अंतर्गत मार्च-२०१९ या महिन्यात जिल्ह्यातील दुर्गम भागातील विविध गावामध्ये फिरते कायदेविषयक साक्षरता शिबिरे व लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या फिरते कायदेविषयक साक्षरता शिबिरे व लोकअदालतीचा शुभारंभ माधुरी आनंद, प्र/अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया यांचे हस्ते १ मार्च २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा न्यायालय गोंदिया येथून करण्यात येणार आहे.
संपूर्ण मार्च महिन्यात ठरलेल्या ठिकाणी विविध विषयांवर कायदेविषयक जनजागृतीपर कार्यक्रम व नंतर लोकअदालतीमध्ये संबंधित न्यायालयातील प्रलंबीत दिवाणी व फौजदारी तडजोड योग्य प्रकरणे तसेच पूर्व न्यायप्रविष्ट प्रकरणांचा समंजस्याने निपटारा करण्यात येणार आहे. याकरीता संबंधित न्यायालयांचे न्यायाधीश तसेच एक वकील व एक सामाजिक कार्यकर्ता हे पक्षकारांना त्यांची प्रकरणे तडजोड करण्यास मदत करणार आहेत.
ज्या पक्षकारांना त्यांची तडजोडपात्र प्रलंबित किंवा दाखलपूर्व प्रकरणे या फिरते लोकअदालतीमध्ये तडजोड करावयाची आहेत त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया तसेच संबंधित तालुका न्यायालयातील तालुका विधी सेवा समितीकडे २५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत संपर्क साधावा.
लोकअदालतीचे आयोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे. गोंदिया तालुक्यात १ मार्चला ग्रामपंचायत कार्यालय नागरा येथे, २ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय दासगाव, ५ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय घोटी, ७ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय कामठा. गोरेगाव तालुक्यात ६ मार्चला ग्रामपंचायत कार्यालय दांडेगाव येथे. अर्जुनी/मोरगाव तालुक्यात ८ मार्चला ग्रामपंचायत कार्यालय झरपडा, ११ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय बोंडगाव/देवी, १२ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय धाबेपवनी. सडक/अर्जुनी तालुक्यात १३ मार्चला ग्रामपंचायत कार्यालय बोपाबोडी येथे, १४ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय पांढरी, १५ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय कोकणा. देवरी तालुक्यात १६ मार्चला ग्रामपंचायत कार्यालय बोरगाव/बाजार येथे, १८ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय परसोडी, १९ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय शेरपार. आमगाव तालुक्यात २० मार्चला ग्रामपंचायत कार्यालय गोरठा येथे, २२ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय साखरी. सालेकसा तालुक्यात २५ मार्चला ग्रामपंचायत कार्यालय सालेकसा येथे. आमगाव तालुक्यात २६ मार्चला ग्रामपंचायत कार्यालय जामखारी येथे. तिरोडा तालुक्यात २७ मार्चला ग्रामपंचायत कार्यालय वडेगाव येथे, २८ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय मुंडीकोटा, २९ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय दवनीवाडा, ३० मार्च- ग्रामपंचायत कार्यालय करटी येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील जनतेनी या फिरते कायदेविषयक साक्षरता शिबिरे व लोक अदालत योजनेअंतर्गत सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.बी.दुधे यांनी कळविले आहे.