गोंदियासाठी काही चांगले करावे हेच आमचे प्रयत्न-खा.प्रफुल पटेल

0
14

परमेश्वराच्या चमत्कारानेच जन्माने मुके नरqसह बोलायला लागले-जयाकिशोरी
गोंदिया,दि.१७ः-येथील सर्कस मैदानावरील आयोजित भक्तीधाम येथे मनोहरभाई पटेल अकादमीच्यावतीने खासदार प्रफुल पटेल व वर्षा पटेल यांच्या सौजन्याने आयोजित नानीबाई का मायरा या कथा प्रवचना कार्यक्रमाचा शुभारंभ जयाकिशोरी यांच्या मधुरवाणीतील प्रवचनाने शनिवार(दि.१६) करण्यात आले.तीन दिवस चालणाèया या कथानकाचे शुभारंभप्रसंगी खासदार प्रफुल पटेल,वर्षा पटेल,खासदार मधुकर कुकडे,आमदार गोपालदास अग्रवाल,उमादेवी अग्रवाल,माजी आमदार केशवराव मानकर,आनंदराव वंजारी,दिलीप बनसोड,माजी.जिपअध्यक्ष विजय शिवणकर,माजी भाजप अध्यक्ष विनोद अग्रवाल,नरेश माहेश्वरी,माजी आमदार राजेंद्र जैन,माजी मंत्री भरतभाऊ बहेकार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
स्व.मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आले.खासदर प्रफुल पटेल यांनी यावेळी बोलतांना कथावाचक राधास्वरुप जयाकिशोरी यांचे अभिनंदन करीत त्यांच्याप्रवचानाने समाजाला सामाजिक बांधिलकी आणि आपल्या परंपरांची जाणिव करुन देण्यात नक्कीच सार्थकी लागणार असल्याचे विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन अपुर्व अग्रवाल यांनी केले.
खा.पटेल यांनी काश्मिरातील पुलवामा येथे झालेल्या घटनेवर शोक व्यक्त करीत शहिदांना आदराजंली वाहिली.आपल्या मातृभूमिची रक्षा करतांना आपले जवानांनी प्राणाची आहुती दिली.आज या घटनेने मन व्याकुळ झाले असुन विरोधी शक्ती हे वारंवार असे कृत्य करीत आहेत.त्यांना धडा शिकवण्याची वेळ आल्याचे म्हणाले.देशात शांतता टिकून राहावे आणि आतंकवादाचा खात्मा व्हावा यासाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहोत.आपण सर्वांनी चांगले मनुष्य बनण्याचा प्रयत्न करायला हवे,सोबतच जनकल्याणाचे कार्यक्रम करुन जनसेवा करण्यासाठीच जयाकिशोरी यांच्या कथावाचनाचे आयोजन करण्यात आल्याचे पटेल म्हणाले.गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या सर्वागंीण विकास हेच आपले सर्वांचे ध्येय आहे.राजकारणाच्यावेळी राजकारण विकासाच्यावेळी आम्ही सगळे एकच आहोत ही भावना सर्वांनी ठेवल्यास आपला भाग समृध्द होण्यास वेळ लागणार नाही असेही म्हणाले.
यावेळी बोलतांना आमदार गोपालदास अग्रवाल म्हणाले की धर्म,अध्यात्माची अनुभूतीने मनाचे शुध्दीकरण होते.भक्तीभावाच्या कथानी नितीगत जिवनात सुख समृध्दी मिळते या आयोजनाने जिल्ह्यातील जनतेला नवा संदेश मिळेल असे विचार व्यक्त केले.खासदार मधुकर कुकडे यांनी जयाकिशोरी यांच्या कथावाचन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभकामना देत प्रफुल पटेल यांना अजुन उंचशिखर गाठण्याची मनोकामना पुर्ण व्हावी असे विचार व्यक्त करीत मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मारवाडी युवक मंडळाचे अध्यक्ष गोqवद अग्रवाल,मंजु अग्रवाल,मारवाडी युवक मंडळ,बढते कदम,पुज्य qसधी जनरल पंचायत,चौरसिया समाज,गुजराती केलवणी मंडळ,वामा महिला सुरक्ष दल,हरे माधव सत्संग समिती,qसधु महिला सेवा समिती,सम्रग ब्राम्हण समाज,लायंस क्लब,राणी सेवा समिती,राईस सिटी,जलाराम मंदिर समिती,गायत्री परिवार,प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थासह इतर सामाजिक संस्थाचे पदाधिकारी उपस्थित राहून आयोजनासाठी सहकार्य करीत आहेत.