देश समृद्ध करण्यासाठी आणखी ५ वर्षे मोदींना देण्याची गरज : विनोद अग्रवाल

0
16

सोनपुरी-पोलाटोला येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन
गोंदिया,दि.17ः : गोंदिया विधानसभा क्षेत्राला राज्यात महत्वाचे स्थान आहे. मात्र महत्व असून या क्षेत्राचा विकास खुंटला आहे, ज्या जनप्रतिनिधीकडे या क्षेत्राचे प्रतिनिधीत्त्व आहे, त्यांनी या क्षेत्राच्या विकासासाठी उदासीनता दाखविली आहे. एकाच कामाचे चार वेळा भूमिपूजन करून आपण क्षेत्राचा विकास करीत आहोत, असे हवी या क्षेत्रात निर्माण करून ठेवली आहे. मात्र विकासकामे व स्वार्थीपणाच्या राजकारणाचा चांगला अनुभव या क्षेत्रातील जनतेला मागील अनेक दिवसांपासून आला आहे. याची जाणीव त्या जनप्रतिनिधीला झाली असून भाजपचा अप्रचार करण्याचे काम सुरू आहे, म्हणून जनतेने अशा खोट्या प्रचाराला बळी पडू नये, असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.

गोंदिया विधानसभा क्षेत्रातील मौजा सोनपुरी-पोलाटोला येथे शासनाच्या २५-१५ लेखाशिर्षक अंतर्गत १४ लाख रूपयाच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना अग्रवाल बोलत होते. विनोद अग्रवाल, भाऊराव उके, सरपंच राखी लेखराम ठाकरे, उपसरपंच राजेश पटले, ग्रा.प.सदस्य होमेंद्र तुरकर, दिनेश वैद्य, सौ.भारती ठाकरे, शिलाबाई पटले, मिराबाई चौधरी, सरीता रीनायत, पोलिस पाटील राजु ठाकरे, तंमुस अध्यक्ष गणराज धुवारे, आळकवी तुरकर, बाबुलाल तुरकर, तानुजी येडे, तुुंडीलाल ठाकरे, मगनलाल पटले, घनश्याम पटले, नेतलाल पटले, अभिमन्यू पटले, पारतलाल पटले, रूपचंद पटले, राधेलाल कटरे, झनकलाल कटरे, गणपत कटरे, गुनीलाल कटरे, साहु ठाकरे, केशवराव ठाकरे, देवचंद कटरे, महेश पटले, माजी उपसरपंच हौसीलाल कटरे, खेमलाल पटले, देबीलाल पटले, सुरजलाल पटले, दशरथ कटरे, कुलपत कटरे, योगीलाल कटरे, बसुदराय कटरे, संतोष कटरे, विरेंद्र मेश्राम, सुरजलाल डोंगरे, धनराज आळकने, नंदकिशोर पानतावणे, सहादेव डोहरे, लाखन रीनायत, श्रावण येडे, धमेंद्र मेश्राम, जितेंद्र मेश्राम, महेश नेवारे, पाडूरंग ठाकरे, धनराज धुवारे, योगराज धुपारे, महादेव डोहरे, सुखदेव डोहरे, पुरनलाल वैद्य, राधेश्याम वैद्य, हरीलाल नेवारे, सुुभाष मेश्राम, दिनेश ठाकरे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.