कचारगड यात्रेत उद्या मुख्यमंत्री,32 वर्षानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री

0
25

गोंदिया,दि.17 : आज रविवारपासून कचारगड यात्रेला सुरुवात झाली असून उद्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.१८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनेगाव (कचारगड) येथे थेट हेलीकॉप्टरने येऊन कोया पुनेमी महोत्सवाचा विधीवत शुभारंभ करणार आहेत.सोबतच अटल महाआरोग्य शिबिराचा ते उदघाटन करणार आहेत. कचारगड यात्रेच्या मागील ३२ वर्षाच्या इतिहासात प्रथमच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसारखा व्यक्ती येत असून या वर्षाची कचारगड यात्रा आणि मुख्यमंत्र्याचा दौरा ऐतिहासिक ठरणार आहे. विशेष म्हणज,े मुख्यमंत्र्यासोबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी सुध्दा कचारगडला भेट देण्यासाठी येत आहेत
धनेगाव/ दरेकसा परिसर अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात असून या भागात मंत्री व नेत्यांचे दौरे फार कमी होतात. मात्र महाराष्ट्र निर्मीतीनंतर मागील 32 वर्षाच्या इतिहासात प्रथमच या राज्याचा मुख्यमंत्री सालेकसा तालुक्यात उतरणार आहे. दरेकसा येथील शसस्त्र दूर क्षेत्राच्या परिसरात हॅलीपॅड बनविले जात असून चारही बाजूंनी डोंगराळ भागाने वेढलेल्या या ठिकाणात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री, पालकमंत्री आणि खासदार, आमदार यांच्या आगमनाने निश्चितच कचारगड यात्रा यावर्षी ऐतिहासीक ठरणार आहे.
या देशाचे मूळ निवासी असलेले आदिवासी यांचे श्रध्दास्थान म्हणून ओळखला जाणारा कचारगड आदिवासीचे उगम स्थळ मानला जातो. त्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजासाठी कचारगड हे स्थळ महत्वाचे असून दरवर्षी माघ पौर्णिमेला या ठिकाणी आपल्या पूर्वजांची आठवण करण्यासाठी त्यांची नैसर्गिक पूजा करण्यासाठी देशभरातील आदिवासी समाज लाखोच्या संख्येने येतात.
दोन वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते आणि महाराष्ट्राचे अर्थंमंत्री सुधीर मुनगंटीवार कचारगड यात्रेत भेट देऊन गेले. पालकमंत्री राजकुमार बडोले सुध्दा अनेक वेळा भेट देऊन गेले. परंतु या स्थळाच्या महत्वाला लक्षात घेता तेवढे सहकार्य शासन स्तरावर करण्यात आले नाही.यापुर्वी काँग्रेसच्या काळात प्रफुल पटेल व तत्कालीन केंद्रीय व राज्यातील आदिवासी मंत्र्यांनी भेट दिल्यानंतही अनेक बाबतीत कचारगड विकासापासून दूरच राहीला