लाखनी येथे शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रम

0
26
लाखनी,दि.१९ःः श्री छत्रपती शिवजी महाराज जयंती उत्सव समिती, लाखनी द्वारे दरवर्षी प्रमाणे १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार मधुकर कुकडे, उद्घाटक विधानपरिषद आमदार डॉ परिणय फुके, या भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सुप्रसिद्ध वक्ते प्रा तुषार उमाळे, विशेष अतिथी म्हणून साकोली विधानसभा आमदार राजेश काशिवार, नगरपंचायत, लाखनीच्या नगराध्यक्षा ज्योती निखाडे, ग्रामपंचायत मुरमाडीचे सरपंच शेषराव वंजारी व ग्रामपंचायत सावरीचे सरपंच संजीवनी नान्हे विशेष अतिथी म्हणून लाभणार आहेत. या शिवजन्मोत्सवानिमित्ताने दुपारी दोन वाजता श्रीराम मंदिर, समर्थ विद्यालयाचे प्रांगणातून भव्य शोभा यात्रा निघणार असून सायंकाळी सहा वाजता प्रा तुषार उमाळे, वर्धा यांचे मार्गदर्शन  समर्थ विद्यालयाच्या भव्य प्रांगणात करण्यात आले आहे. कार्यक्रमापरांत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन याप्रसंगी समितीचे अध्यक्ष बाबुराव निखाडे, उपाध्यक्ष संजय वणवे, सचिव ऍड कोमलदादा गभने, सहसचिव अजिंक्य भांडारकर, प्रशांत वाघाये, कोषाध्यक्ष प्रवीण शेलार, संयोजक कौस्तुभ भांडारकर, सहसंयोजक बाळासाहेब चव्हाण, सांस्कृतिक प्रमुख डॉ संजय कुमार निंबेकर, विष्णू तळवेकर, विक्रम रोडे, पंकज भिवंगडे, संदीप भांडारकर, किशोर वाघाये, गुणवंत दिघोरे यांनी केले आहे.
शिवरुद्रम व लाखनी मित्र परिवार तर्फे शिवजयंती साजरी 
लाखनी शिवजयंती निमित्त सकाळी आठ वाजता बाईक रॅली, दुपारी तीन समर्थ मैदान येथे स्वराज्य ढोल ताशे या तर्फे महावादन तसेच शिवकालीन देखावे आयोजित करण्यात आले आहे. समर्थ ग्राउंड येथे शिवाजीराजे यांची भव्य रांगोळीचे दर्शन याप्रसंगी आयोजित करण्यात येणार आहे. सायंकाळी आठ वाजता डॉल्बी साउंड आणि लेझर शो आयोजित करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन शिवरुद्रम व लाखनी मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.