दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी मोदीच उत्तम पर्याय : अग्रवाल

0
16

गोंदिया,दि.20 : देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले. स्वहित बाजूला सारून देशहिताला सर्वोच्च प्राथमिकता देण्याचे काम मोदींच्या नेतृत्वात भाजपा सरकारने केले. दहशतवाद व देशाची शांती, एकता भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर पाऊल उचलण्यात आले. भारतीय सैन्याचे हात मोकळे करून दहशतवाद्यांशी सामना करण्याची सूट देण्यात आली. यामुळे भारतीय सैन्यातर्फेऑपरेशन ऑल आऊट राबवून दहशतवादाचा बीमोड केला जात आहे. असे असले तरी दहशतवादाचा भस्मासुर संपलेला नाही, हे नुकत्याच झालेल्या पुलवामा येथील हल्ल्यातून दिसून आले. यामुळे दहशतवाद व देशविरोधी, सर्वसामान्यविरोधी शक्तींचा नायनाट करण्यासाठी मोदीच उत्तम पर्याय आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्राम रतनारा येथे शासनाच्या २५-१५ लेखाशिर्षअंतर्गत बाजार चौक फोनटोली येथे सभागृह बांधकामाचे भूमिपूजन विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते उपस्थित नागरिकांना संबोधित करताना बोलत होते. याप्रसंगी दोन मिनिटे मौन पाळून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. कार्यक्रमाला माजी जि.प. सभापती छाया दसरे, भाऊराव उके, रतनाराच्या सरपंच रेखा चिखलोंडे, ग्रा.पं.सदस्य सतीश दमाहे, किरण डोहरे, ओमेश्वरी ढेकवार, कौशल्या डोंगरे, टाकचंद ढेकवार, झनकलाल लिल्हारे, हरिप्रसाद चिखलोंडे, योगिप्रसाद धामडे, किसनसाव राऊत, शाळा समितीचे अध्यक्ष बैरवार, सुरेश डोंगरे, फागुलाल लिल्हारे, लक्ष्मी लिल्हारे, रमेश बटवार, शामजी बोरकर, छगन राऊत, बसंत धुवारे, भजन लिल्हारे, गणेश मोहारे, चतरू दसरे, नंदू मोहारे, हौसलाल मोहारे, राजेंद्र बटवार, जितेंद्र लिल्हारे, लखन लिल्हारे, सदाराम देशमुख, तंमुस अध्यक्ष चैनलाल लिल्हारे, दिवाकर डोंगरे, मुन्ना लिल्हारे, विनोद कटकवार, बसंत चिखलोंडे, मसराम चचाणे, ठानसिंग बसेने, नेतन धुवारे, रमेश बैटवार, संतोष दसरे, चुन्नीलाल बसेने, सदाशिव दाऊदसरे आदी उपस्थित होते