26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ हरीत सेनामध्ये निशुल्क नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन 

हरीत सेनामध्ये निशुल्क नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन 

0
32
गोंदिया,दि.23: वन व वन्यजिव यांच्या संरक्षणाकरीता हरीत सेनेमध्ये निशुल्क नोंदणी करुन सहभागी होता येणार आहे. गोंदिया जिल्हा कृषि व पलास महोत्सव प्रदर्शनीमध्ये हरीत सेनेचे स्टॉल लावण्यात आले असून  सदर ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी भेट घेऊन हरीत सेनेत सहभागी व्हावे असे आवाहन रोहयो उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे यांनी केले आहे.
 हरीत सेना मार्फत विविध कार्य केले जात आहे. वन विभागाच्या मालमत्तेचे संरक्षण करणे, वन्य प्राण्यांच्या संरक्षण करणे,  वणवा लागला असल्यास विझविण्यास मदत करणे किंवा संबंधितांना माहिती देणे, वन संपत्तीची चोरी थांबविणे, अवैद्य शिकार झाली असल्यास त्याची माहिती टोल फ्री क्रमांक 1926 वर कळविणे इत्यादी कार्य हरीत सेना मार्फत केले जात आहे म्हणुन जास्तीत जास्त नागरीकांनी हरीत सेनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.