अर्जुनी मोरगाव ,दि.0७ः-: अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील प्रशासकीय इमारती सुसज्ज करण्यावर भर दिला असून नवीन अद्यनावत इमारतीतून जनतेची कामे त्वरित व्हावी हा उद्देश ठेऊन अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी ३ कोटी ७0 लाखांचा निधी शासनास्तरावर मंजूर करून आणला. अत्यंत जुनी असलेली ही इमारत मोडकळीस आली असल्याने जनतेच्या व प्रशासनाच्या मागणीनुसार हा निधी मंजूर करण्यात आली आहे. लवकरच या नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरूवात होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
कार्यक्रमाला आ. डॉ. देवराम होळी, जिप अध्यक्ष सीमा मडावी, सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती करुणा नांदगावे, जिप सदस्या कमल पाऊलझगडे, मंदा कुंभरे, तेजुकला गहाणे, पंस सदस्य नाजुका कुंभरे, आशा झिलपे, पिंगला ब्राम्हणकर, अर्चना राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानिधी, गटविकास अधिकारी जमईवार प्रामुख्याने उपस्थित होते.





