34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ प्रशासनाचे दुर्लक्ष,न्यायासाठी ठवरे दाम्पत्याचे उपोषण सुरू

प्रशासनाचे दुर्लक्ष,न्यायासाठी ठवरे दाम्पत्याचे उपोषण सुरू

0
48

blank

देसाईगंज,दि.१५ःः जिल्हा न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही अवैधरित्या घरावर ताबा घेऊन बसलेल्या एका स्थानिक वृत्तपत्राच्या सपांदक व प्रशासनाच्या विरोधात घरमालक असलेल्या अनुसूचित जातीतील वृद्ध दाम्पत्याने आज १५ मार्चपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. नामदेव ठवरे यांनी आपल्या पत्नीसह बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन करुन आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.एकीकडे जिल्हा न्यायालयाने ठवरे यांच्या बाजूने निर्णय दिलेला असतानाही त्यांना त्यांचे घऱ मिळत नाही.अशापरिस्थितीत त्यांना शासन प्रशासनाकडे धाव घेऊनही कुणीही मदतीला न आल्याने आमरण उपोषणाचा निर्णय़ घेत या आंदोलनादरम्यान काही झाल्यास सर्व जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असे ठवरे दाम्पत्यांचे म्हणने आहे.

blank