रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणावर चालला बुलडोजर

0
17

मुख्याधिकारी रामटेके यांची धडक मोहिम

देसाईगंज दि.१६ःःदोन दिवसापुर्वी दुर्गा मंदिरासमोरिल नगर परिषद शॉपींग सेंटर जवळील मुख्य मार्गावरील दुकानदारांचे अतिक्रमण हटविल्यानंतर आज (दि.१६)शनिवारला जय अंबे कपडा दुकानाच्या मालकाने थेट मुख्य मार्गावर आणलेल्या पायर्य्रा नगर परिषद मुख्याधिकारी डॉ कुलभुषन रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पथकाने काढून रस्ता मोकळा केला आहे.या मोहीमेमुळे अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
मनोज लालवाणी यांनी देसाईगंज नगर परिषद मध्ये मालमत्ता क्रमांक ६४ म्हणुन नोंद असलेल्या तसेच मौजा देसाईगंज नझूल शहर खसरा नंबर २२ मधील प्लाट नंबर २८ क्षेत्रफळ २५०० चौ फुट तसेच नझूलच्या शासकिय जागा खसरा नंबर २३/१० एकुण क्षेत्रफळ २५०० चौ फुट अशी एकुण ५००० चौ फुट क्षेत्रफळ असलेल्या जागेवर क” वर्ग असलेल्या देसाईगंज नगरपरीषद हद्दीत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ मधील तरतुदीचे पुर्णत: उल्लंघन करुन तळघर, तळमजला अधिक प्रथम मजला,द्वितीय मजला,तृतिय मजला व चौथा मजला चे नियमबाह्य व बेकायदेशिररित्या अनाधिकृतपणे बिनापरवानगी संरचनात्मक बांधकाम केले आहे. याबाबत आजुबाजुच्या रहिवासी धारकांनी लेखी तक्रारी केल्या, परंतु राजकिय हस्तक्षेपामुळे यांना अवैध बांधकामाला अभय मिळत होते.मात्र १० मार्च २०१९ ला आदर्श आचारसंहिता लागतात शहरात झालेला अतिक्रमण काढतांना राजकिय हस्तक्षेप होणार नसल्याने नगर परिषद प्रशासन मागील दोन दिवसापासुन शहरातील अतिक्रमणधारकांवर कारवाई चा बडगा उगारुन अतिक्रमण काढण्याची धडक मोहिम हाती घेतली असल्याचे सांगीतले जात आहे.
वारंवार सुचना देऊन ही दररोज भरत असलेल्या दुर्गा मंदिरासमोरिल खुल्या मैदानात सकाळच्या गुजरीत मनमानी करुन बाजारपेठ कंत्राटदाराला न जुमानता मुख्य रस्त्यावर आलु लसन कांद्याचा दुकान थाटुन वाहतूकीला अडथळा निर्माण करणाय्रा दुकानदारांवर देसाईगंज नगरपरीषदचे मुख्याधिकारी डॉ कुलभुषन रामटेके यानी आज सकाळीच कारवाईचा बडगा उगारुन रस्त्यावर अतिक्रमण करून दुकान थाटणाय्राविरुद्ध दोन दिवसापुर्वीच तातडीने कारवाई केल्याने अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबेदणाणले होते आज ही दुसरी कारवाई झाल्याने अतिक्रमणधारक हादरले आहेत….