कायाकल्प योजना अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव ला जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार

0
29

देसाईगंज,दि.16:–  देसाईगंज तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव ला कायाकल्प योजना अंतर्गत जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून सदर पुरस्कार नुकताच जिल्हाधीकारी गडचिरोली च्या जिल्हा नियोजन सभागृह मध्ये गडचिरोली जिल्हा परिषद चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत शंभरकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रुदे जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.
जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांचे वतीने सर्व आरोग्य केंद्रात कायाकल्प योजना राबवीत असून या योजने अंतर्गत आरोग्य सेवा देतांना आरोग्य केंद्रातील सर्व रेकॉर्ड चे दस्तावेजीकरन लाभार्थींना उत्क्रुष्ट सेवा सुविधा.स्वच्छता इत्यादी निदेशक लक्षात ठेवून तालुका स्तरीय टीम ने मूल्यमापन करून जिल्हा स्तरावर शिफारस केलेल्या आरोग्य संस्था चे जिल्हा स्तरीय टीम ने मूल्यमापन करून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव ची निवड करून तालुक्याचे नाव रोषन केले
सन 2018-19 या वर्षी पासून प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ अभिषेक कूम्भरे यांनी जेव्हा पासून पदभार स्वीकारला तेव्हा पासून त्यांनी कोरेगाव च्या आरोग्य केंद्राचा व जेव्हा पासून तालुका आरोग्य अधिकारी देसाईगंज च्या नवीन प्रभार घेतला तेव्हा तालुक्याचा कायापालट करायचं असं चंग बांधून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली
डॉ कुंभरे यांना साथ मिळाली सर्व आरोग्य कर्मचारी यांची सर्व आरोग्य कर्मचारी यांनी उत्कृष्ट साथ देत कोरेगाव मधे प्रसूती चे प्रमाण वाढविले 24 तास आरोग्य सेवेला प्रारंभ केला आरोग्य केंद्राची स्वच्छता सर्व रेकॉर्ड चे सुशोभीकरण इत्यादी करून दाखविले त्यांची फलश्रुती मिळाली व आरोग्य केंद्राला जिल्हा स्तरीय दोन लाख चा प्रथम पुरस्कार मिळाला.
दिनांक 15 मार्च 2019 ला जिल्हा परिषद गडचिरोली येथे जिल्हा स्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला सदर पुरस्कार डॉ विजय राठोड मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात आले.सदर पुरस्कार चा स्वीकार डॉ अभिषेक कुंभरे वैद्यकीय अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी देसाईगंज, डॉ अशोक गहाणे वैद्यकीय अधिकारी कोरेगाव, चंद्रकांत चहारे आरोग्य सहाय्यक.गीता धानौरे आरोग्य सहायीका कोरेगाव,निर्मला घोरमोडे आशा कोरेगाव व जौत्स्ना रामटेके गटप्रवर्तीका कोरेगाव यांनी स्वीकारला.पुरस्कार प्रदान करते वेळी डॉ सुनील मडावि जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, डॉ विनोद म्हसाखेत्री साथ रोग अधिकारी डॉ अनुप महेशगौरी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, सोनाली जोगदंडे जिल्हा समन्वय प्रधानमंत्री मात्रु वंदन योजना गडचिरोली उपस्थित होते.कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम पुरस्कार मिळाल्या बद्दल तालुक्यातील आरोग्य कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव ला जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला त्या बद्दल या तालुक्याचा अभिमान आहे याच धरती वर इतर आरोग्य केंद ना पुरस्कार साठी तयारी करणार
डॉ अभिषेक कुंभरे,तालुका आरोग्य अधिकारी देसाईगंज