26.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गोंदिया शहरात पोलीसांचे पथसंचलन

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गोंदिया शहरात पोलीसांचे पथसंचलन

0
33

गोंदिया,दि.१८ः-जिल्ह्यात ११ भंडारा-गोंदिया व १२ गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता आचारसंहिता लागू झाली असून येत्या ११ एप्रिलला मतदान होणार आहे.त्यानिमित्ताने निवडणुका खुल्या,निष्पक्ष,निर्भय व मोकळ्या वातावरणात पाडण्यासाठी जनतेत विश्वास निर्माण करण्याच्या हेतून आज(दि.१८)सायकांळी ४ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्ष विनिता शाहू यांच्या नेतृत्वात पथसंचलन करण्यात आले. पथसंचलनात अप्पर पोलीस अधिक्षक संदिप आटोळे,पोलीस उपअधिक्षक सोनाली कदम,उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्यासह पोलीस उपअधीक्षक मुख्यालय,सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,ठाणेदार,पोलीस कर्मचारी,केंद्रीय राखीव दलाच्या कपंनीसह एकुण ४३ पोलीस अधिकारी,४९१ कर्मचारी व ५० गृहरक्षकदलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.गोंदिया शहराच्या इंदिरा गांधी स्टेडियम परिसरातून फ्लग मार्चला सुरवात झाली. शहरातील मुख्य बाजारपेठ, रामनगर पोलीस स्टेशन ,मामा चौक,गांधी चौक मार्ग फ्लग मार्चची सांगता इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये करण्यात आली.

blank