दिव्यांग व्यक्तींना मतदानाविषयी माहिती देण्यासाठी ग्रामस्तर सभेचे आयोजन

0
15

Ø  26 ते 30 मार्चला सभा Ø  जिल्हयात 6200 दिव्यांग मतदार Ø  जिल्हा प्रशासनाचे विशेष् प्रयत्न

भंडारा,दि. 22 :- 11 एप्रिल 2019 रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करणे सुरु केले आहे. या निवडणूका दिव्यांग सुलभ निवडणूका व्हाव्यात असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्या दृष्टीने जिल्हयातील दिव्यांग मतदारांना मतदानाविषयी माहिती देण्यासाठी 26 ते 30 मार्च दरम्यान ग्रामस्तर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेमध्ये साधनव्यक्ती, शिक्षक, बीएलओ, तलाठी, ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाद्वारे दिव्यांग मतदारांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. सोबतच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण सुध्दा देण्यात येणार आहे. ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींना मतदान प्रक्रीयेत भाग घेणे साईचे होणार आहे.

अध मतदारासाठी बेल  ‍लिपीतील नमुना मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे मतदान केंद्रावर मतदान करतांना ईव्हीएम मशीनच्या उजव्या बाजूला उमेदवारांचा अनुक्रमांक 1 ब्रेल लिपीत लिहीलेला आहे, याबाबत जागृती करण्यात  येणार आहे. अंध मतदारांना    मतदानाच्या वेळी आपल्या सोबत सोबती नेता येईल. सोबत्यांचे घोषणापत्र भरुन दयावे लागणार आहे.

वाचा दोष व कर्णदोष असलेल्या मतदारांना त्यांना समजेल अशा भाषेत निवडणूकीत मतदान करण्याबाबत माहिती  समजून देण्यात येणार आहे. जे मतदार मतदान केंद्रापर्यंत चालत येवू शकत नाहीत अशा 3 ते 5 मतदारासाठी व्हिलचेअरची व्यवस्था संबंधित ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद यांचे मार्फत करण्यात येईल. जिल्हयात एकूण 6200 दिव्यांग मतदार असून या सोई सुविधांचा त्यांना फायदा होणार आहे. दिव्यांग मतदारांची नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी आदि सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी pwd App  चा वापर करता येणार आहे. जिल्हयातील सर्व दिव्यांग मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.