मतदार ओळखपत्राशिवाय करता येणार मतदान ११ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य

0
40

गोंदिया दि.२७. : येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदारांना मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे फोटो ओळखपत्र दिले आहे. मतदार ओळखपत्र नसलेल्या मतदारांना मतदान करण्यासाठी ११ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात आले आहे. यामध्ये पासपोर्ट, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र किंवा राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम अथवा सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखप), छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅनकार्ड, एन.पी.आर.अंतर्गत आर.जी.आय.द्वारे दिलेले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्ताऐवज, खासदार किंवा आमदार किंवा विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र व आधारकार्ड यापैकी कोणताही दस्ताऐवजाचा समावेश आहे. मतदानाच्या प्रसंगी कोणताही एक दस्ताऐवज मतदाराला सोबत आणावा लागणार आहे.