लाखांदुरात सिध्दार्थ युथ क्लब व मिशन अधिकारी केंद्राच्यावतीने पाणपोईचे उदघाटन

0
11
 लाखांदुर,दि.02 : उन्हाळ्याची चाहूल लागली, की पूर्वी शहरात चौकाचौकांमध्ये पाणपोया दिसायच्या.पारा जसजसा भडकायचा तसतशी या पाणपोयांवर वर्दळही दृष्टीस पडायची. रस्त्याने जाता-येता घशाला पडलेली कोरड दूर करताना चार घोट गार पाणी घशाखाली उतरले, की हायसे वाटायचे. मात्र, आता शोधूनही या पाणपोया सापडत नाहीत. कारण सध्या चालु असलेली लोकसभा निवडणुकीची तयारी, व शेतकऱ्यांचे शेतातील कामे.  त्यामुळे तो सेवाभावाचा गारवाही अनुभवणे आता दुरापास्त होऊन बसले आहे. समाजातली सहृदयता संपली की काय, असे वाटण्याइतकी भीषण परिस्थिती आज पाहायला मिळत असतांनाच तालुक्यातील मिशन अधिकारी स्पर्धा परीक्षा केंद्र व सिद्धार्थ युथ क्लब च्या वतीने लाखांदूर येथील टी पॉइंटवर “तहानलेल्यांसाठी पाणी”  या शीर्षकाखाली पाणपोईची सुविधा करण्यात आली आहे.
तहानलेल्याला घोटभर पाणी पिऊ घालणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळेच मिशन अधिकारी स्पर्धा परीक्षा केंद्र व सिद्धार्थ युथ क्लब ने आपला सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचे गार पाणी मोफत उपलब्ध करून दिले आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाही एकमेकांसाठी वेळ नाही. मात्र तरीही आज ग्रामीण भागात पहावेतो माणुसकी जिवंत आहे. कोणत्याही माध्यमातून का असेना पण सेवा घडावी हा एकच हेतू मनाशी बाळगून लाखांदूर येथील तरुणांनी तहानलेल्यांना पाणी मिळावं म्हणून पाणपोईची व्यवस्था केली.
    सदर पाणपोईचे उद्घाटन 1 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता माजी पोलीस पाटील  दामाजी मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून  वासू मेश्राम , सुनील बारसागडे, दयाल भोवते,  वसंता बावणे,अशोक मोहुर्ले, झकास फुल्लुके, निशाद लांजेवार , तराचंद गुरुनुले तसेच ग्रामवासी जनता उपस्थित होती.ज्यांच्या प्रयत्नामुळे ही पाणपोई उभी झाली असे कामेश बावणे अध्यक्ष सिद्धार्थ युथ क्लब, निखिल मोहुर्ले, अमित कोचे, राहुल तुपटे, रोहित रामटेके,साहिल मस्के , प्रवीण रंगारी , सौरभ बंसोड त्याचप्रमाणे अधिकारी स्पर्धा परीक्षा केंद्राचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.