स्वच्छतेच्या संदेशाखालीच अस्वच्छतेचा कळस

0
8

गोंदिया,दि.०३-शहरात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात नगर परिषदेच्या माध्यमातून कागदोपत्री आणि खर्चाची रक्कम काढण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवली गेली.स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी qभतीसोबतच उड्डाणपुलाच्या खांबानाही रंगविले गेले.स्वच्छतेचा संदेश दिला गेला.परंतु आजूबाजूच्या नागरिकांनाच नव्हे तर उड्डाणपुलाखाली व्यवसाय करणाèयांनाही आपण स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे असे न वाटल्याने बाजारपरिसरासह मुख्य चौकातही घाणीचे साम्राज्य दिसून येते.
त्यातच रात्रीला कचरा उचलण्यासाठी लावलेले ट्रक्टर व सफाई कर्मचारी कुठे जातात हे कुणालाच ठाऊक नाही.त्यातही हा कंत्राट नगराध्यक्षांच्या जवळच्या एका व्यक्तीला देण्यात आल्याचे बोलले जात आहे.त्यावर सुमारे १ कोटी रुपये खर्च होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.परंतु शहरातील कचरा मात्र जशाचे तसे दिसून येत आहे. कचरा कुंड्या तयार करण्यात आल्या मात्र त्याची ना देखभाल ना स्वच्छता यामुळे त्यातील कचरा बाहेर पडू लागला आहे.सांडपाण्याच्या नाल्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
वर्दळीचा जयस्तंभ चौकात तर नेहमीच दिवसभर कचèयाच्या ढिगाèयात प्रवाशांना ताटकळत बसावे लागते.येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोरील उड्डाणपुलाखालील एका सिमेंटच्या खांबावर स्वच्छतेचा संदेश दिला त्याच खांबाखाली अस्वच्छतेने कळस गाठला परंतु नगरपरिषदेच्या स्वच्छताविभागासह नगरसेवकालाही दिसेना अशी अवस्था झाली आहे.