ताडगुडा येथे भव्य करसड यात्राःमाजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले पूजन!

0
16

एटापल्ली,दि.04 :- तालुक्यातील जांबिया गट्टा लगतच्या ताडगुडा येथे बुधवार 3 एप्रिल रोजी करसड यात्रेत माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी करसड यात्रेला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले आणि पूजन केले.ताडगुडा येथील करसड यात्रेत माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
करसड यात्रेत सर्व प्रथम माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पूजा अर्चा करून यात्रेची सुरुवात केले. त्या नंतर आदिवासी संस्कृती व परंपरेनुसार करसड यात्रेला सुरुवात झाली. ढोल ताशे व बासरीच्या सुरांनी पूजेचे बिगुल वाजविण्यात आले.आदिवासी परंपरे नुसार असंख्य भाविक भक्तांनी पूजन करून करसड यात्रेत सहभागी झाले.यात्रे दरम्यान माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सैनू गोटा व सेवानिवृत्त शिक्षक हिचामी यांच्या घरी भेट दिले आणि ऍड. लालसू नरोटी यांचीही भेट आणि सामाजिक विषयावर चर्चा झाली.
भेटी व यात्रे दरम्यान एटापल्ली पंचायत समितीचे सभापती बेबीताई लेकामी, राजू नरोटी, सांबय्या पुंगाटी, दौलत दहागावकर, बाबुराव तोरेम, सरपंच बालाजी गावडे, मुक्तेशवर गावडे, नागेश करमे, कैलास कोरेत आदी व असंख्य भाविक उपस्थित होते. करसड यात्रेत जांबिया गट्टा, ताडगूडा व परिसरातील असंख्य भाविक आणि बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.