डाक्टरच्या निष्काळजीमुळे रेल्वे कर्मचाऱ्याचे निधन

0
16

नांदेड,दि.04ः- रेल्वे मंडळामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णालयातच रेल्वे कर्मचाऱ्यांची डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे निधन झाल्याने रेल्वे कर्मचाऱ्यात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी रुग्णालयासमोर काही काल रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राजशेखरराव असे या निधन झालेल्या कर्मचार्यांचे नाव आहे. मंगळवारी दुपारी राजशेखरराव याची अचानक तबियत बिघडली होती या कारणांमुळे त्याला रेल्वे रुग्णालयात भरती करण्यात। आले. परंतु डॉक्टरांच्या दुर्लक्ष पणामुळे रुग्णावर वेळेवर उपचार न मिळाल्याने तबियात जास्तच बिघडत गेली त्यातच निधन झाले.
रेल्वे प्रशासनाने आपल्या कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून काम करीत असतात त्यांचा व त्यांच्या कुटुंबासाठी आपत्कालीन परिस्थिती त अथवा आजापानात योग्य तो उपचार पद्धती मिळावी यासाठी करोडो रुपये खर्च करून रुग्णालयाची निर्मिती केली खरी पण स्थानिक कर्मचार त्यातल्या त्यात डॉक्टर यांनी महिन्याला गलेलठ्ठ पगार उचलायची व रेल्वे विभागाच्या सर्व सोयीसुविधाच्या उपभोग घ्यायचा एवढेच काम आहे. याचेच निष्काळजी पणाचे उदाहरण काल राजशेखर या व्यक्तीच्या निधनानंतर समोर आले आहे .यावेळी मृतकाच्या नातेवाईकांनि रेल्वे रुग्णालयातील डॉक्टर यांनी रुग्णांच्या जीविताशी खेळ खेळत असून वेळेवर उपचार न मिळाल्याने आमचा माणूस गमवावा लागला याला जवाबदार कोण यासठी दोषी कर्मचारी व डॉक्टर यांवर कारवाईची मागणी केली असुन परंतु रेल्वे विभाग यांवर काय निर्णय घेईल हे पाहणे आतुक्याचे ठरणार आहे.