विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे ध्येय ठेवा-डाॅ.रतनलाल

0
16

गोंदिया,दि.15 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघीणीचे दूध असून जो हे दूध पिणार तो गुर्गुरल्याशिवाय राहणार असे सांगितले होते. मात्र आता देशातील शिक्षण व्यवस्था ही केवळ जी सर म्हणणारी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे ध्येय ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाचे प्रो.डॉ.रतनलाल यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे रविवारीे (दि.१४) येथील प्रशासकीय भवनासमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने सुनील बौध्द, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी.निमगडे, आप चे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम मोदी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निलेश देशभ्रतार, मंगला नंदेश्वर, अमित भालेराव उपस्थित होते. कार्यक्रमाचीे सुरूवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करुन करण्यात आली. प्रो.रतनालाल म्हणाले, १३ पार्इंट रोस्टरच्या विरोधातील लढाई जरी आपण जिंकली असली तरी अशी लढाई आपल्याला वांरवार लढावी लागू शकते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा सन्मान करीत असल्याचे ढोंग सरकार करीत असून असे ढोंगी सरकार सत्तेवर राहिल्यास वांरवार लढा उभारावा लागेल. त्यामुळेच आता शिक्षण व्यवस्थेला वाचविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. मागील वेळेस जेएनयू आणि विद्यापिठात वाद निर्माण करुन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्यामुळे असा प्रयत्न पुन्हा होवू नये यासाठी रस्तावर उतरुन लढा देण्यासाठी तयार राहा असे आवाहन देखील त्यांनी केले.या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विलास राऊत यांनी केले तर आभार समितीचे अध्यक्ष निलेश देशभ्रतार यांनी केले.

गोंदियातील जल्लोषात‘हॅप्पी बर्थ डे…..’ गाण्याची धूम

‘कसा शोभला असता भीम नोटावर…’ या गाण्यावर बेधुंद होत नाचत असलेल्या तरूणाईने बाबासाहेबांचा जयघोष करीत त्यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. हजारोंच्या संख्येत सहभागी आंबेडकरी बांधवांच्या रॅलीने रविवारी शहर दुमदुमून गेले असतानाच गोंदियाकरांचे लक्ष वेधून घेतले होते.बाबासाहेबांवरील सर्वच गाणी तशीही सुपरहीट व लोकप्रिय आहेत. यामुळेच रॅलीत बाबासाहेबांवरील ही गाणी प्रामुख्याने वाजविली जातात. ही गाणी वाजताच आंबेडकरी बांधवांना एक स्फूर्ती मिळते. तोच प्रकार या रॅलीत दिसून आला. ‘कसा शोभला असता भीम नोटावर’ हे गाणे वाजताच त्यावर जल्लोष करीत तरूणाई बेधूंद नाचत असताना दिसली. तर बाबासाहेबांचा जन्मदिवस असल्याने त्यांच्यावरील ‘हॅप्पी बर्थ डे टू यू…..’ या गाण्याचीही रॅलीत एकच धूम होती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरात निघणाऱ्या भव्य रॅलीची शहरातील एक परंपराच आहे. महामानवाला जन्मदिनाची शुभेच्छा देण्यासाठी व त्यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी शहरात निघणाºया या रॅलीत मोठ्या संख्येत लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत महिला व पुरूष सहभागी होतात. शहरातील प्रत्येक परिसरातील आंबेडकरी समाजबांधव आपापली वेगळी रॅली काढत असतात. यानंतर सर्व रॅली एकत्र आल्याने एक भव्य रॅली तयार होत असून गोंदियाकरांचे लक्ष वेधून घेते. शहरातील मुख्य मार्गाने निघत असलेल्या या रॅलीत ढोल-ताशे व डिजेवर धुंद होत नाचत गात आंबेडकरीबांधव बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. यंदाही शहरात भव्य रॅली निघाली व आंबेडकरी बांधवांनी एकच जल्लोष करीत आपला आनंद व्यक्त केला. ‘कसा शोभला असता भीम नोटावर’ सारख्या गाण्यांवर नाचत तरूणाईने बाबासाहेबांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सर्व रॅलीचा आंबेडकर चौकात समारोप करण्यात आला.
ठिकठिकाणी खाद्य पदार्थांचे वितरण
सकाळपासूनच शहरात निघत असलेल्या या रॅलीत चिमुकल्यांपासून तर वयोवृद्धही सहभागी होतात. नाचत गात आपला आनंद व्यक्त करीत निघालेल्या या आंबेडकरी बांधवांना तहान व भूक लागल्यास इतरत्र जावे लागू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी खाद्य पदार्थ व पेयांचे वितरण केले जाते. विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी व काही बांधवांकडून खाजगीस्तरावर ही सर्व व्यवस्था करण्यात येते. त्यानुसार यंदाही रॅलीतील बांधवांसाठी टरबूज, लस्सी, पाणी, सरबत, मिल्कशेक, पुलाव, पोहे, उपमा आदी खाद्य पदार्थांचे वितरण करण्यात आले.

पत्रकारसंघाने साजरी केली बाबासाहेबांची जयंती
आमगाव-तालुका पत्रकार संघाचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२८ वी. जयंती पत्रकार संघाचे अध्यक्ष इसुलाल भालेकर. याच्या अध्यक्षतेखाली.साजरी करण्यात आली.यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष झेड. एस.बोरकर,कोषाध्यक्ष सुनिल क्षीरसागर,प्रचार प्रमुख आनंद शर्मा,विकास शर्मा,यशवंत मानकर,रितेश अग्रवाल,सुनिल पडोले,दिनेश शेंडे,अजय खेतान,महेश मेश्राम,रेखलाल टेंभरे,नरेंद्र कावडे, प्रा.डि.एस.टेंभुणे,दिनेश शेंडे,काँग्रेस नेते रामसिंग चव्हाण,संजय बहेकार,संतोष गुप्ता आदी उपस्थित होते.