साई मंदिरातर्फे शव शीतपेटी जनतेच्या सेवेत

0
42

मोहाड़ी,दि.27 :- साईबाबा सार्वजनिक मंदिर कमिटी राजेंद्र वार्ड, मोहाडीच्या वतीने शव शीतपेटी जनतेच्या सेवार्थ नगरपंचायत मोहाडीच्या स्वाधीन करण्यात आली. यामुळे एखाद्याचे निधन झाल्यावर त्याचे नातेवाईक येण्यास उशीर होत असेल तर या शव शीतपेटीचा मोठा उपयोग होणार आहे.
मोहाडीत शव शीतपेटीची आवश्यकता होती, एखाद्याला आवश्यकता भासल्यास दुसऱ्या शहरातून ही शीतपेटी आणावी लागत होती. साई मंदिराकडून व्यवस्था करण्यात आल्याने येथील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. एखाद्या वेळेस एखाद्या चे निधन झाले व त्याचे जवळचे नातेवाईक फारच दूरच्या शहरात राहत असेल तर अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांना येण्यास बराच वेळ काळ लागत असायचे, अशावेळी निधन झालेल्या व्यक्तीचे शरीर काही तास सुव्यवस्थित राखण्यासाठी शीतपेटीची आवश्यकता होती. आता ही सोय मोहाडी येथे उपलब्ध करून देण्यात आली असून ही शीत पेटी विनामूल्य मिळणार आहे.नगरपंचायती मधून सुव्यवस्थित नेणे आणि आणणे संबंधितांना करायचे आहे.यासाठी नगरसेवकांशी संपर्क करता येईल, याप्रसंगी साईबाबा सार्वजनिक मंदिर कमिटीचे संचालक आशिष पात्रे, अरविंद नंदनवार, सिराज शेख, महेश निमजे, नगराध्यक्ष गीता बोकडे, उपाध्यक्ष सुनील गिरीपुंजे, नगरसेवक हरिराम निमकर, राजन सिंगन जुडे, प्रदीप वाडीभस्मे, गणेश निमजे, माजी नगराध्यक्ष स्वाती निमजे, अरुण श्रीपाद, नगरसेवका कविता बावणे, मनीषा गायधने, शोभा बोरडे, अभियंता नंदकिशोर येवतकर, गोकुल बडवाईक, अफरोज पठाण इत्यादी उपस्थित होते.