नगरपंचायतीच्या विरोधात नगरविकास आघाडीचा आंदोलनाचा इशारा 

0
16
सालेकसा,दि.01- येथील नगरपंचायतीच्यावतीने आमगाव खुर्द व सालेकसा येथील वार्डातील समस्यांचा निपटारा करण्यासोबतच स्थानिकांना रोजगाराची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात टाळाटाळ केल्यामुळे नगरविकास आघाडीच्यावतीने नगरपंचायतीच्या कार्यप्रणालीच्या विरोधात मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे २९ एप्रिल रोजी मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.निवेदन देतेवेळी नगर विकास आघाडीचे बबलूभाऊ कटरे,मनोज डोये,शैलेश बहेकार,निर्दोष साखरे,दौलत अग्रवाल,इसुलाल राऊत, विजय फुंडे,सुनील असाटी,राकेश रोकडे,रमेश चुटे,मयूर चौरे,काशिनाथ पाथोडे,मनोज शिवणकर,मुस्ताक अंसारी,शैलेश बावणे,संतोष गिèहेपुंजे,रवींद्र चुटे,सुरेंद्र डोयेसह अनेकांचा समावेश होता.
मुख्याधिकारी यांच्यामार्फेत जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात नगरपचांयत क्षेत्रातील लोकांना रोजगाराची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी शासनाची असल्याने महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ (सुधारणा २००६ )अन्वये क वर्ग नगरपरिषद,नगरपंचायत क्षेत्रात राज्य रोजगार हमी योजना अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.त्यानुसार नगरपंचायतीने काम करावयास हवे होते परंतु नगरपंचायत सालेकसाच्या पदाधिकाèयांच्या दुर्लक्षामुळे आत्तापर्यंत कामाचे नियोजन व मागणी प्रस्ताव सादर करण्यात आले नसल्याने बेरोजगारांना काम मिळू शकले नाही.८ ऑगस्ट २०१८ पासून आमगाव खुर्द ग्रामपंचायत क्षेत्राच्या समावेश सालेकसा नगरपंचायत मध्ये झाल्याने या क्षेत्राची सीमावाढ करुन कामांचा नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला नसल्याने आमगाव खुर्द क्षेत्राशी सावत्र व्यवहार केला जात आहे.पथदिव्याची दुरुस्ती केली जात नाही.सांडपाणी वाहून नेणाèया नाल्यांची स्वच्छता केली जात नाही.घन कचèयाची योग्य विल्हेवाट होत नाही.गावातील रस्त्यांची दुरुस्ती केली गेलेली नाही.आठवडी बाजाराची जागा उपलब्ध असतानाही बाजार रस्त्यावर भरवून वाहतुकीला खोळंबा निर्माण केला जात आहे.कंत्राटी तत्वावर नियुक्त गावातील महिला व पुरुषांना शासकीय दरानुसार रोजी दिली जात नसल्याचे म्हटले आहे.या सर्व समस्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा २३ मे पासून नगरविकास आघाडी आंदोलनात्मक मार्ग स्विकारेल असे नमुद करण्यात आले आहे.