हिरडामालीच्या शेतक-यांना दोन दिवसात पाणी द्या-आ.रहांगडाले

0
15
गोरेगाव,दि.०1:तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकल्पामुळे परिसरातील अनेक गावातील शेतकèयांनी खरीपसोबतच रब्बीचे पिक घ्यायला सुरवात केली आहे.सध्याच्या घडीला पिण्याचे पाणी सोडून रब्बी पिकाकरीता पुरेल एवढे पाणी धरणात असतानाही तालुक्यातील हिरडामाली येथील शेतकèयांना पाणी देण्यास टाळाटाळ होत असल्याने आमदार विजय रहागंडाले यांनी पाहणी करुन दोन दिवसात पाणी देण्याचे निर्देश मध्यम प्रकल्प विभागाला दिले.
कटंगी मध्यम प्रकल्पाच्या कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने शेतापर्यंत पाणी पोचण्यास अडचण जात असल्याची तक्रार शेतकèयांनी केल्याने (दि.३०)रोजी आमदार रहागंडाले यांनी कालव्याची पाहणी केली.यावेळी मध्यम प्रकल्प विभागाच्या अभियंत्याना बोलावून त्वरीत कारवाईचे निर्देश दिले.यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रेखलाल टेंभरे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष गुड्डू कटरे ,न.प.सदस्य रेवेंद्र बिसेन,मोरेश्वर कटरे,दिलीप चव्हाण,अंकीत रहांगडाले,नरेंद्र हरिणखेडे,ब्रम्हानंद ठाकुर,योगेश रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते.