रिकाम्या दारूच्या बाटल्यानी विहीर भरली,दारुबंदीचा फज्जा

0
20

चंद्रपूर,दि.09ः- काँग्रेसची सत्ता जाताच सत्तेवर बसलेल्या भाजपच्या नेत्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न बनवित चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय घेतला.त्यासाठी श्रमीक एल्गार या संघटनेनेही आंदोलने केली होती.परंतु त्या आंदोलनाचा आणि दारुबंदीचा पुर्णतः फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.त्याचे असे की दारुबंदी असलेल्या चंद्रपूर शहरातील भानापेठ वार्डातील एक विहिर चक्क दारुच्या रिकाम्या बाटल्यांनी भरल्याचे उघडकील आले अन दारुबंदीचा पुर्णतःनागरिकांनी कसा फज्जा उडविला हे बघायला मिळाले. नाल्या, नाल्याचे गटारांमध्येही दारूच्या बाटल्यांचा खच दिसून येत आहे. सार्वजनिका शौचालये सुद्धा मद्यपींसाठी दारू पिण्याचे केंद्र ठरत असल्याने तिथेही दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खर्च दिसून येत आहे.

हातपंप, विहिरी, तलाव कोरडे पडल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचे चित्र असताना चंद्रपुरात मात्र, एक विहीर दारूच्या रिकाम्या बाटल्याने खचाखच भरलेली आढळून आली आहे, एैकून नवल वाटेल. मात्र, दारूबंदी असलेल्या चंद्रपूरात दारूच्या रिकाम्या बाटल्यांनी भरलेली विहीर आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही विहीर चंद्रपूरातील दारूबंदीचे वास्तव दाखविणारी ठरली आहे.उलट आधीपेक्षा अधिक दारुची मागणी वाढली असून इच्छुकांच्या खिश्यावरही ताण पडू लागला आहे.
जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी दारूबंदी झाली. दारूबंदीला चार वर्षांचा काळ लोटत असतानाही दारूबंदीचे सकारात्मक पडसाद दिसून येत नाही. जिल्ह्यात करण्यात आलेल्या दारूबंदीमुळे समाजात अनेक मोठे बदल घडेल याची अपेक्षा जनमानसात होती. मात्र, अजूनही छुप्या पद्धतीने अवैध दारूविक्री सुरू आहे. शहरातील भानापेठ वाडत असलेल्या एका विहिरीत मोठय़ा प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे दारूबंदी फसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या विहिरीत दारूच्या रिकाम्या बाटल्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, स्नॅक्स पॉकेट यांचा खच आढळून आला. दारू पिल्यानंतर रिकाम्या झालेल्या बाटल्या फेकण्यासाठी ही विहीर मद्यपींना कामात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे असली दारूबंदी काय कामाची असा सवाल आता विरोधक करीत आहेत.
या सर्व प्रकारामुळे या जिल्ह्यात खरंच दारूबंदी आहे. असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.एकंदरीत जिल्ह्यात दारूबंदी असली तरी ही दारूबंदी नावालाच असल्याचे चित्र आहे. पोलिस प्रशासनाकडून दारूबंदी यशस्वी झाल्याचा कितीही दावा केला जात असला. तरी हा दावा पोकळ असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.