पोलिसांना मिळणार वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टी

0
27

गोंदिया : पोलिस अधीक्षक विनिता साहू यांनी जिल्हा पोलिस दलातील सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी व लिपीकवर्र्गीय कर्मचार्‍यांना त्यांचे वाढदिवस किंवा त्यांच्या मुलांचे वाढदिवस किंवा त्यांच्या आई वडिलांचे वाढदिवस तसेच अँनिव्हर्सरी या महत्वाचे कामाकरिता सुट्या देण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलिस दल हे प्रशासनिकदृष्ट्या व नागरिकांप्रती जागरूक राहून काम करीत असते. वेळप्रसंगी त्यांना वैयक्तिक कामे असतानाही ते रजेवर जाऊ शकत नाहीत. पोलिस अधिकारी, कर्मचारी व मंत्रालयीन कर्मचारी यांना दैनंदिन कामाच्या व्यापामुळे बरेचदा त्यांचे वाढदिवस, त्यांच्या मुलांचे वाढदिवस किंवा त्यांच्या आई-वडिलांचे वाढदिवस तसेच अँनिव्हर्सरी आदी कामाकरिता हजर होणे व आपल्या कुटुंबाला वेळ देणे शक्य होत नाही, तसेच दैनंदिन कामाच्या व्यापामुळे त्यांच्यात ताणतणाव निर्माण होऊन त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो. या सर्व बाबींचा विचार करून यापुढे त्यांना त्यांचे वाढदिवस, त्यांच्या मुलांचे वाढदिवस किंवा त्यांच्या आईवडिलांचे वाढदिवस तसेच अँनिव्हर्सरी आदी कामाकरिता सुट्या देण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक साहू यांनी घेतला आहे.