विंधन विहिरीची दुरुस्ती आणि विहिरी खोलीकरणाची होणार कामे

0
13

ङ्घ ७९ ठिकाणी होणार ३ लक्ष ९२ हजारातून कामे
गोंदिया, दि.२५.: जिल्हाधिकारी गोंदिया यांनी टंचाई निवारणाच्या कामासाठी असलेल्या अधिकाराचा वापर करुन तिरोडा आणि अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील ७९ गावे/वाड्यामध्ये असलेल्या विंधन विहिर विशेष दुरुस्तीचे काम आणि विहिरीतील गाळ काढण्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
तिरोडा तालुक्यातील सालेबर्डी येथे जिल्हा परिषद शाळेजवळ, पिंडकेपार येथे आंबेडकर पुतळ्याजवळ, पांजरा येथे श्री.येवले यांच्या घराजवळ, नवेगाव/खुर्द येथे किशोर कुंभरे यांच्या घराजवळ, मुरपार येथे श्री.बुध्दे यांच्या घराजवळ, मुंडीपार येथे दामोदर गजभिये यांच्या घराजवळ, मंगेझरी येथे ग्रामपंचायत जवळ, मांडवी येथे जोशीलाल दमाहे यांच्या घराजवळ, कोयलारी येथे मोतीलाल पटले यांच्या घराजवळ, खुरखडी येथे सुरजलाल बोपचे यांच्या घराजवळ, खेरबोडी येथे मोतीलाल चामलेटे यांच्या घराजवळ, गराडा येथे काशीराम उके यांच्या घराजवळ, चुरडी येथे महादीप चचाने यांच्या घराजवळ, चोरखमारा येथे प्राथमिक जिल्हा परिषद शाळेजवळ, बोरगाव येथे अंगणवाडी जवळ, बोरा येथे लखन चचाणे यांच्या घराजवळ, भजेपार येथे सार्वजनिक शौचालय जवळ, बेलाटी/बु. येथे कॅनल जवळ, बघोली येथे जूने ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, बरबसपुरा येथे काशीराम पालांदूरकर यांच्या घराजवळ, मेंदीपुर येथे प्राथमिक जिल्हा परिषद शाळेजवळ, जमुनिया येथे प्राथमिक जिल्हा परिषद शाळेजवळ, डब्बेटोला येथे ग्रामपंचायत कार्यालया मागे, पुजारीटोला येथे ढेकण किरणापुरे यांच्या घराजवळ, मरारटोला येथे तुकाराम बोबडे यांच्या घराजवळ, परसवाडा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ, बिरोली/सोनोली येथे किशन ठाकरे यांच्या घराजवळ, करटी/बु. येथे हनुमान मंदीर जवळ, करटी/खु. येथे ग्रामपंचायत जवळ, धादरी येथे गणेश चौहाण यांच्या घराजवळ, खमारी येथे सार्वजनिक शौचालयाजवळ, पिपरीया येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, सावरा/बोंडराणी येथे बोंडराणी मंदीराजवळ, बिहिरीया येथे श्री.ठाकरे यांच्या घराजवळ, माल्ही येथे सुखदेव पटले यांच्या घराजवळ,‍ सिल्ली/निलागोंदीटोला येथे गायत्री मंदिराजवळ, मलपुरी येथे आंबेडकर पुतळ्याजवळ, चंदोरी येथे खालेश्वर मिश्रा यांच्या घराजवळ, बेरडीपार/खु. (बेरडीपारटोला) येथे यादवराव टेंभरे यांच्या घराजवळ, नहरटोला येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, खैरलांजी येथे श्री.कडव यांच्या घराजवळ, चिखली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ, अर्जुनी/टाकीटोला येथे पाण्याच्या टाकी मागे, बिरसी येथे जिल्हा परिषद शाळेत, घाटकुराडा येथे श्रीमती गोपिका पावणे यांच्या घराजवळ, सेजगाव येथे अंगणवाडी जवळ, निमगाव येथे फुलचंद टेंभरे यांच्या घराजवळ, ठाणेगाव येथे श्रीमती गरीबा नेवारे यांच्या घराजवळ, सरांडी येथे लक्ष्मण माने यांच्या घराजवळ, भिवापुर/ढिवरटोला येथे ऊर्जापंप जवळ, केसलवाडा येथे आरोग्य केंद्र जवळ, आलेझरी येथे रवी पटले यांच्या घराजवळ, सुकळी येथे साधुबाबा मंदिराजवळ, लोणारा येथे श्रीराम सोयाम यांच्या घराजवळ, बोपेसर येथे ग्रामपंचायत परिचर यांच्या घराजवळ, मुंडीकोटा येथे समता कॉलोनीत, सर्रा येथे आशिष बंसोड यांच्या घराजवळ, सतोना येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, लाखेगाव येथे रविदास पुतळ्याजवळ, विहिरगाव येथे खोडगाव रोडवर, गोंडमोहाडी येथे जिल्हा परिषद शाळेजवळ, चंदोरी/खुर्द येथे खैरलांजी जवळ, बेरडीपार/काचेवानी (सिंदीटोला) येथे जिल्हा परिषद शाळेजवळ, वडेगाव येथे हनुमान मंदिरजवळ, मेंढा येथे सकाराम सुर्यवंशी यांच्या घराजवळ, चिरेखनी येथे पाणी टाकीजवळ पुजारीटोला रोड, कवलेवाडा/ढिवरटोली येथे प्राथमिक शाळेजवळ, मारेगाव येथे बाबुलाल कंगाले यांच्या घराजवळ, घोगरा/ भिमनगर (पाटीलटोला) येथे ऐनकलाल कावळे यांच्या घराजवळ, भंभोडी येथे दयाराम डिकवार यांच्या घराजवळ, येडमाकोट येथे बाबुराव डांबरे यांच्या घराजवळ, लेदडा येथे दुर्गा मंदीर जवळ, बोदलकसा येथे दिलीप उके यांच्या घराजवळ, इंदोरा/खु. येथे सोनवाने गुरुजीच्या घराजवळ, खडकी येथे ग्रामपंचायत जवळ, डोंगरगाव येथे बुधाजी खडके यांच्या घराजवळ, खोपडा येथे अशोक आत्राम यांच्या घराजवळ अशा एकूण ७७ गावे/वाड्यामध्ये विंधन विहिर विशेष दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून या कामावर ३२ लक्ष ९ हजार ९४५ रुपये खर्च होणार आहे.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील झाशीनगर येथे गावठाण परिसरात व कान्होल येथे गावठाण परिसरात या २ ठिकाणी विहिरीतील गाळ काढण्याचे काम करण्यात येणार असून या कामावर ६२ हजार १७६ रुपये खर्च होणार आहे. अशा एकूण ७९ ठिकाणी ३ लक्ष ९२ हजार १२१ रुपयांमधून विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीची आणि विहिरीतील गाळ काढण्याची कामे करण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.