आजी माजी सैनिकांकडून जमिनीसाठी २९ मे पर्यंत अर्ज मागविले

0
18

गोंदिया, दि. २७.: जिल्हयातील आजी आणि माजी सैनिकांसाठी तिरोडा तालुक्यातील सातोना येथील जमीन उपलब्ध झाली आहे. इच्छुक आजी व माजी सैनिकांनी विहित नमुन्यात अर्ज करुन २९ मे २०१९ पर्यंत तहसिल कार्यालय तिरोडा येथे सादर करावे. अर्जाचा नमुना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत येथे उपलब्ध आहे. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गोंदिया यांनी कळविले आहे.
०००००
विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती इच्छुक व्यक्तीकडून अर्ज मागविले
गोंदिया,दि. २७. : तालुका आणि जिल्हास्तरावर भ्रष्टाचार निर्मुलन समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली आहे. आता विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे. तरी इच्छुक व्यक्तीने १० जून २०१९ पर्यंत आपले परिपूर्ण भरलेले अर्जाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथील संकीर्ण शाखेत न चुकता सादर करावे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, गोंदिया यांनी कळविले आहे.