ट्रॅक्टर उलटून एक ठार

0
24

भंडारा,दि.29 : तुमसर तालुक्यातील खरबी येथे सिमेंटचे वीज खांब वाहून नेणारा ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एक मजूर ठार तर एक जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली.त्यात विजय वसंता बडवाईक (४४) हा मजूर जागीच ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.