योग जीवनाचा अविभाज्य भाग- हृषीकेश मोडक

0
18

वाशिम, दि.21- आजच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनात  तंदुरुस्त राहण्यासाठी काही जण जीममध्ये जातातकुणी धावतात तर कुणी व्यायाम करतातप्रत्येक भारतीयाने  शारिरिकदृष्टया तंदुरुस्त राहून मानसिकदृष्टया सक्षम झाले पाहिजेसंपन्न आयुष्य जगण्यासाठी योग महत्वाचा असून योग हा जीवनाचा अविभाज्य भाग आहेअसेप्रतिपादन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक  यांनी केले.

      आज 21 जून रोजी वाशिम येथील वाटाणे लॉनमध्ये 5 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालयभारत सरकार,महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त वतीने करण्यात आलेमुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी मोडक यावेळी बोलत होतेमंचावर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दीपककुमार मीनापोलीस अधिक्षक वसंत परदेशीपतंजलीचे डॉभगवंतराव वानखेडेआर्ट ऑफ लिव्हींगचे डॉहरीष बाहेतीविद्याभारतीचे दिलीप जोशी,स्वामी सत्यानंद योग केंद्राचे राम छापरवालवाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

      श्रीमोडक पुढे म्हणालेभारतीय संस्कृतीत योगाला महत्व आहेप्रत्येकाने सुखी संपन्न निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग केले पाहिजेयोग केवळ योग दिवस आहेम्हणून  करता तो दररोज नियमितपणे केला पाहिजेअसे सांगितले.      योग दिनाचे औचित्य साधून डॉभगवंतराव वानखेडेविजय चव्हाण आणि दीपा वानखेडे यांनी उपस्थित योगसाधकांना योगमुद्राध्यानमुद्रावक्रासनवज्रासन,उत्तानपादासनपवनमुक्तासनकपालभारतीप्राणायामभद्रासन यासह विविध योग शिकविलेशौर्य वानखडे या बालकाने देखील विविध प्रकारचे योग करुन उपस्थित योगसाधकांकडून प्रशंसा    मिळविली.पतंजली योग समितीआर्ट ऑफ लिव्हिंगविद्याभारतीस्वामी सत्यानंद योग केंद्रभारत स्वाभिमानभारत स्काऊट गाईडराष्ट्रीय छात्र सेनाराष्ट्रीय सेवा योजना,लॉयन्स क्लबनेहरु युवा केंद्रव्यंकटेश योग अभ्यास मंडळाचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केलेयोगसाधक म्हणून विविध क्षेत्रातील व्यक्ती,विविध विभागाचे अधिकारीकर्मचारी तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.      यावेळी 20 जून रोजी पतंजली परिवार आणि आर्ट ऑफ लिव्हींग परिवाराच्या वतीने माँ गंगा मेमोरिअम ट्रस्टच्या श्री.श्रीरवीशंकर हॉलमध्ये रांगोळी स्पर्धेतील विजेतेप्रतिक्षा वानखेडेभारती गटलेवारसायली जहागीरदारप्रियंका गोळेराजेश खंडाळकर यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू  प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

      प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलेपाहुण्यांचे स्वागत वृक्षाचे रोपटे भेट देवून करण्यात आलेकार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी तानाजी नरळेयांनी केलेसंचालन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटिये यांनी केलेउपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी श्रीउप्पलवार यांनी मानलेराष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.