सिकलसेल जागृती दिवस कार्यक्रम बिजीडब्ल्यू हॉस्पिटल येथे संपन्न

0
35

गोंदिया,२१ जून:- सिकलसेल हा रक्तातील लाल रक्तपेशींचा रोग असुन प्रामुख्याने बालकांमध्ये व क्वचितप्रसंगी वयस्कांमध्येही हा रोग आढळतो. मध्य भारतात, काही विशेष जाती-जमातीत हा रोग प्रामुख्याने आढळतो. हा रोग आनुवंशिक परंपरेचा आहे आणि AS (सिंगल पैटर्न) व SS (डबल पैटर्न) मध्ये आढ़ळतो. या रोगाविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने स्थानिक बि जी डब्ल्यू हॉस्पिटल येथे जागतिक सिकल सेल जागृती दिना निमित्त जनजागरण कार्यक्रम सिकल सेल डे केयर सेंटर व संविधान मैत्री संघ सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला हॉस्पिटल प्रशासकीय विभागातील अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर, संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, रक्तपेढी जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाने, सिकल सेल डे केयर सेंटरच्या फुले मैडम, कृपाल मैडम, मनोज बनसोड प्रामुख्याने उपस्थित होते.अतिथी प्रमुखानी जनजागृती करताना आपल्या शब्दातुन सिकल सेल बद्दल माहिती देताना सांगीतले की या व्याधीवर कोणताही विशिष्ट उपचार नाही. आणि दिसून येणाऱ्या लक्षणानुसार उपचार केले जातात. जंतूसंसंर्ग होऊ नये म्हणून वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून प्रचलित प्रतिजैव‌किे रोज एकदा किंवा दोनदा दिली जातात. यात फॉलिक अॅसिड व खनिजयुक्त जीवनसत्त्वांच्या गोळ्यांचा समावेश असतो. सिकलसेलग्रस्त बालकांना डॉक्टरांनी आखून दिलेल्या पूर्ण लसी द्याव्यात. तसेच ८ ते २४ महिन्यांदरम्यान न्यूमोनिया संरक्षक लसही द्यावी. दर पाच वर्षांनी ही लस देत राहावी अगदी प्रौढावस्थेतही. रोगीना काही अड़चण असल्यास किंवा अधिक माहिती करिता वैद्यकीय चिकित्सकांना भेटण्याचे आवाहन या प्रसंगी अतिथी मान्यवरांतर्फे करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीते करिता शासकीय रक्तपेढी व सिकल सेल दे केयर सेंटरच्या कर्मचारी सेवकानी सहकार्य केले.