प्रकल्पग्रस्तांनी मानले शिशुपाल पटलेंचे आभार

0
19

भंडारा,दि.22 : उमरेड-कऱ्हांडला-पवनी या अभ्यारण्याची 2012 मध्ये व्याप्ती वाढवण्यात आली. मात्र यात समाविष्ठ 8 गावांचे पुनर्वसनाचा प्रश्न रेगांळत होता. प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनंतर माजी खासदार शिशुपाल पटले  यांनी संबंधीत विभागाकडे सतत पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला.पुनर्वसनाच्या प्रकारासंदर्भात प्रकल्पग्रस्तांचे एकमत व्हावे या अनुषंगाने 18 जून रोजी पाहुनगाव येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत माजी खासदार शिशुपाल पटले यांना आमंत्रित करून प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे आभार मानले. सर्व प्रकल्पग्रस्तांनी एकत्र बसून कोणत्या पदृधतीने  पुनर्वसन हवे आहे यावर एकमत करावे आणि ग्रामसभांचा ठराव घेवून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा असे आवाहन शिशुपाल पटले यांची यावेळी केले.
उमरेड-कऱ्हांडला-पवनी या अभयारण्याचे 2012 मध्ये क्षेत्र वाढविण्यात आले. यामध्ये पाऊणगाव, गवळशी, गायडोंगरी, जोगीखेडा, आवडगाव, धामनगाव, चिचगाव हमेषा या 8 गावांचा समावेश असून 3 गावे आबादी तर ५ गावे रिठी आहेत. या तीन आबादी गावांतध्ये 605 कुटूंब असून 2.95 चौ.कि.मी. शेतजमीनीचा या प्रकल्पात अंतर्भाव करण्यात आला आहे. यासाठी 6.34 चौ. कि.मी. क्षेत्र अधिग्रहीत करावे लागणार आहे. प्रकल्पग्रस्तांच्या  पुनर्वसनासाठी शासनाने घरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अथवा  प्रकल्पग्रस्तांना 10 लक्ष रूपये जागेसाठी द्यावेत असे 2 निकष ठरवून दिले आहेत. दोन पैकी एक पर्याय प्रकल्पग्रस्तांना निवडायचा आहे. त्यासंबंधीचा ग्रामसभेत ठराव घेवून शासनाला द्यायचा आहे. मात्र यावर प्रकल्पग्रस्तांचे  एकमत होत नसल्याने पुनर्वसनाचे काम रेंगाळत आहे. यावर माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या मार्गदर्शन तोडगा निघावा या हेतूने या सभेचे  आयोजन करण्यात आले होते. 2012 पासून हे प्रकरण सुरू असतांना प्रकल्पग्रस्तांच्या विनंती नंतरही कोणीच याकडे लक्ष दिले नव्हते. विश्राम भवनात प्रकल्पग्रस्तांनी शिशुपाल पटले यांनी निवेदन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने  पाठपुरावा करून माजी खासदार शिशुपाल पटले यांनी हा प्रश्न मार्गी लावला.माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्स देवेंद्र फडनवीस यांनी ५ डिसेंबर २०१८ ला विशेष बैठक लावून तातडीने सदर गावांचा उमरेड- कऱ्हांडला- पवनी अभयारण्यात समावेश करण्याला मंजूरी दिली.
18 जून 2019 रोजी या विषयावरच सभा घेवून प्रकल्पग्रस्तांनी शिशुपाल पटले यांचे आभार मानले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगीतले.यावेळी अरूण आसई, आनंद माहुरे, सरपंच जासुंदा महाजन, उपसरपंच नरेश माहुरे, नरेश कुरूडकर(पो.पा.),सिध्दार्थ गजभीये,राजेश माहुरे गोविंदराव फुंडे, सुनील लांजेवार, प्रकाश कटरे आदी उपस्थित होते.