भंडारा जिल्ह्यात पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या

0
65

भंडारा,दि.22ः-जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या २१ अधिकार्‍यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. सोबतच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी अधिकार्‍यांच्या बदल्यांसोबतच २३५ पोलीस कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या केल्या आहेत. बदलीस पात्र असलेल्या कर्मचार्‍यांना पोलीस अधीक्षकांनी बोलावून कर्मचार्‍यांच्या सोयीनुसार नियुक्ती दिली आहे.

जिल्ह्यातंर्गत बदल्यांत नक्षल सेलचे पोलीस निरीक्षक एम.एच. कोरेटी यांची लाखांदूरचे ठाणेदार म्हणून बदली करण्यात आली आहे. जिल्हा वाहतूक शाखेचे बि.आर. गाडे यांना हटवून मानव संसाधनमध्ये कार्यरत चंद्रशेखर चकाटे यांची बदली करण्यात आली आहे. गाडे यांना सुरक्षा शाखेत पाठविण्यात आले. लाखांदूरचे ठाणेदार निशांत मेश्राम यांना नक्षल सेलमध्ये पाठविण्यात आले. मोहाडीचे ठाणेदार शिवाजी कदम यांची पोलीस अधीक्षकांचे वाचक म्हणून बदली करण्यात आली आहे. नव्याने बदलीवर रूजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.एन. ठाकूर यांची सिहोराच्या ठाणेदार म्हणून, एन.बी. वाजे यांची मोहाडीचे ठाणेदार, पोलीस अधीक्षकांचे वाचक एस.डी. लांबाडे यांची स्थानिक गुन्हे शाखा तर करडीचे ठाणेदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.एन. उईके यांची बदली करण्यात आली आहे.
वरठी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन. राऊत यांची भंडारा पोलीस ठाणे, साकोलीचेपोलीस उपनिरीक्षक आर.डब्ल्यू. रेवतकर यांची लाखनी पोलीस ठाणे, एस.व्ही. राठोड यांची उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तुमसर, पी.आय. कुरसंगे यांची लाखांदूर पोलीस ठाणे, एस.आर. लांजेवार यांची आर्थिक गुन्हे शाखा, पी.एस. रामटेके यांची वरठी पोलीस ठाणे, आर.एस. शिखरे यांची तुमसर पोलीस ठाणे, एम.डी. वंजारी यांची महिल सेल, एस.जी. टेकाम यांची तुमसर पोलीस ठाणे, एस.व्ही. उईके यांची स्थानिक गुन्हे शाखा तर लाखनीचे पोलीस उपनिरीक्षक एस.एस. निराळे यांची साकोली पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.