साकोली अपघातातील जखमींची खासदारांकडून विचारपूस

0
13

साकोली,दि.22ः- साकोली तालुक्यातील कुंभली गावाजवळ चुलबंद नदीपात्रात काळीपिवळी प्रवासी वाहन कोसळून झालेल्या अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता.चार जण गंभीर जखमी झाले होते.त्यानंतर अपघातातील गंभीर जखमींना भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले होते.खासदार सुनील मेंढे यांनी आज अपघातस्थळी जाऊन संपूर्ण माहिती घेतली. तसेच  रुग्णालयातील जखमींची विचारपूस करीत जखमींना उपचारासाठी आवश्यक सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश रुग्णालयाच्या डॉक्टरांना दिेले. यावेळी जि.प. सदस्य नेपाल रंगारी, नगराध्यक्षा धनवंत राऊत, तालुकाध्यक्ष लखन बर्वे, भोजू कापगते, शालिक खर्डेकर, उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे,प्रादेशिक परिवहन  अधिकारी प्रसाद झाडे, रायपूरकर, कार्यकारी अभियंता संजीव जगताप , तहसीलदार टेले आदी उपस्थित होते.भीषण अपघातातील मृतांसाठी तसेच जखमींसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मेंढे यांनी सांगितले.